Tuesday, July 15, 2025
Homeमारेगावकुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, मजुर घेवुन जाणाऱ्या आटोचा अपघात....

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात, मजुर घेवुन जाणाऱ्या आटोचा अपघात….

शिवणाला येथील 10 मजुर जखमी, खडकी (बु) फाट्यावरील घटना

नागेश रायपूरे, मारेगाव:- कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नांत, मजुर घेवुन जाणाऱ्या आटोचा अपघात होवुन यात दहा मजूर गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना आज 26 डिसेंबर च्या सकळी 9.30 वाजताचे दरम्यान खडकी फाट्यावर घडली.

छकुली भुतु रामपुरे (15), मंगला आत्राम (32), अर्चना नागो टेकाम (27), पर्वता रामभाऊ वाघाडे (23), तानेबाई भीमा आत्राम (60), ज्योती सुनील आत्राम (25), शोभा फुलू आत्राम (37), संगीता भीमराव आत्राम (17), रंगू बाई साहेबराव टेकाम (65), अर्चना पैकु आत्राम (19) सर्व रा.शिवनाळा असे अपघातात जखमींचे नावे आहे.

प्राप्त माहिती नुसार शिवणाला येथील दहा मजुर हे गोधणी येथे आटोने शेतमजुरी साठी जात असतांना महामार्गावरील खडकी फाट्यावर आटोच्या समोर अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नांत आटो चालकाचे नियंत्रण सुटल्याने आटो थेट खडकी फाट्यावरील बस निवाऱ्यावर आदळला. जखमींना ग्रामीण रुग्णालयात तत्काळ भरती करण्यात आले. या अपघातात छकुली रामपुरे ,रंगुबाई टेकाम, पर्वता वाघाडे, अर्चना टेकाम, मंगला आत्राम हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना यवतमाळ चंद्रपूर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments