•त्यांचा विरुद्ध निवेदन देणारे की, त्यांना सहकार्य करणारे?
•शेती विकून सरपंच निवडून आणू म्हणनारा ‘ तो गाव ठेकेदार’ कोण ? आपला सरपंच आला तर रात्री चाले खेळ का?
अजय कंडेवार,वणी:- तालुक्यात राजकीय राजधानी समजल्या जाणारी कायर ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच पदासाठी “गावविकास परिवर्तन पॅनलच्या वतीने राकेश वी शंकावार “, काँग्रेसचे उमेदवार राहुल येनगंटीवार व अपक्ष मधून नागेश धनकसार यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. तिन्ही उमेदवार चांगलेच मेहनत घेत आहे.गावात एकुण 3 पॅनल एकास एक उभे आहेत तर निवडणुक रणधुमाळीत प्रत्येक गावराजकारणात एक विशेष बाब समोर येत आहे की, पक्षाने तिकीट नाहीं दिली तर बंडखोरी करायची व इकडे तिकडे उड्या मारायच्या तेही साध्य नाहीं झालं तर निवडणुकीकरीता ठेकेदार बघायच….अशी अवस्थाही काही उमेदवारांची झाली आहे.त्यातच अपक्ष हे नावापुरता अपक्ष असतात का? मग त्याचावर अवाढव्य खर्च किँवा बॅनर खर्च कोण करतात ? हा विचार करणारा प्रश्नच .. याकडेही मतदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे. यातून एकच निष्कर्ष निघतो की, सत्ता भोगण्यासाठी पक्ष सोडून ठेकेदार पाहणे किंवा अपक्ष उभे राहणे हा राजकारणाचा ट्रेंडच म्हणायला हरकत आहे. मतदार सुज्ञ आहे त्यांना उमेदवार कोण कसा माहिती आहे….
गावातील सर्वाँना एकत्र करीत ‘ ‘एक बदल घडवा सर्व बदल घडतील’ अशी सत्ता काबीज करण्यासाठी पक्ष उमेदवारापेक्षा “एक ठेकेदार “आपला सरपंच यावा, याकरीता शेत जागा व ढाबे बुकिंग करीत असल्याची गावात खमंग चर्चा आहे . आणि सरपंच आला तर रात्री खेळ चाले का? असा ही गावात संशय व्यक्त केला जात आहे.
या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप यांच्यात दिवसेंदिवस रंगत वाढत असून निवडणुकीच्या दिवसापर्यंत आणखीन काय आरोप केले जातात याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागून आहे .तर गावकरी “गाव विकास करण्यासाठी” राकेश ” च सक्षम उमेदवार असल्याचं बोलल्या जात आहे. कारण त्या उमेदवाराचा सहकार्य करण्याची वृत्ती तसेच त्याचा स्वभाव अतीशय वेगळा आहे म्हणून मतदार त्याचा कामावर ठाम असून हा “गाव विकास करणारा सरपंच उमेदवारच” विकासकामांना नक्की गती देईल असा ठाम विश्वास गाव मतदार करीत आहे आणि अतिक्रमणधरकाचा खरा सरपंच निवडून देण्याची वेळही आली आहे.