अजय कंडेवार,वणी:- वणी शहर व सेवादल काँग्रेस कमिटी तर्फे स्व. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती निमित्य वणी नगर परिषद परिसर येथे स्व. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्याला हारार्पण अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे, अध्यक्ष शहर सेवादल प्रमोद लोणारे, काजल शेख,उत्तम गेडाम, रवी कोटावार, दिनेश पाऊणकर, चंदन धाबेकर, राजू पेंढारकर, सुवर्णा किनाके आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.