•रिफाईंड तेलाने चरबी वाढताहेत
अजय कंडेवार,वणी:- नैसर्गिक सुगंध आणि आवश्यक पोषक घटकांचे उत्तम प्रमाण यामुळे गेल्या दोन ते अडीच वर्षांमध्ये घाणीच्या तेलाला ग्राहकांची पसंती मिळत आहे. रिफाइंड तेलाच्या तुलनेत घाणी तेलाची वाढत असलेली मागणी फिटनेसबाबतच्या जागरुकतेचा नवीन ट्रेंड दर्शवित आहे.फोडणी देण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी खाद्यतेल गरजेचे असते. खाद्यतेल आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे कोणते खाद्यतेल आहारात वापरायला हवे हेदेखील महत्त्वाचे ठरते. सध्या कच्ची घाणी तेलाला बाजारात चांगली मागणी आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, करडई, तीळ, मोहरी, जवस आदी तेलबियांचे लाकडी घाणीमधून तेल काढले जाते. मुख्य म्हणजे रिफाइंड ब्राण्डेड तेलाच्या तुलनेत दर कमी असल्याने महिन्याकाठी चाळीस टक्के बचत सहज शक्य आहे. रिफाइंडच्या तुलनेत घाणीचे तेल कमी लागत असल्याचा ग्राहकांचा अनुभव आहे.’प्रकारच्या तेलातील चिकटपणामुळे शरीराला आवश्यक असणारे स्निग्ध आम्ल, जीवनसत्व-ई आणि खनिजे मुबलक प्रमाणात मिळतात. त्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते.
रिफाईड तेल शरीराला घातक का मानले जाते?:-
• सिंगल रिफाईडसाठी गॅसोलिन, सिथेटिक अँटिऑक्सिडंटस्, हेक्सेन आदी केमिकल्स वापरली जातात. डबल रिफाईडमध्ये रसायने जास्त असतात.
• रिफाईंड तेलाचा वास येत नाही, कारण त्यात एकाही प्रकारचे प्रोटीन शिल्लक राहात नाही. त्यावरील प्रक्रियेचा हा परिणाम असतो.
•रिफाईंड तेलाला चिकटपणा नसतो. कारण त्यातले फॅटी अॅसिड आधीच बाहेरकाढले जातात. त्यामुळे ते अत्यंत हलके वाटते.
• रिफाईड तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि मिनरल्सही नसतात.
रिफाईंड तेलाने वाढत आहेत हृदयरोगी :-
“हृदयविकारामुळे मृत्यू होणायाची संख्या सर्वाधिक आहे. लठ्ठपणा आणि चुकीचा आहार केज तयारही त्यामागील महत्वाची कारणे आहेत. या दोन्ही गोष्टी टाळायच्या असतील तर आहारात शुद्ध तेलाचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.”