• 27 मार्च 1992 साली ‘केशव नागरी’ या पतसंस्थेचबीज रोवलं गेलं आणि आज एक “मोठे वटवृक्ष”तयार.
अजय कंडेवार,वणी:- “वट वृक्षायं बीज मोहरी हून लहान असतं, त्याला मायेने पाणी घालावं लागतं जबाबदारीने जोपासावं लागतं तेव्हाच त्याचा वटवृक्ष होऊ शकतो.” २७ मार्च १९९२ साली ‘केशव नागरी’ या पतसंस्थेच बीज रोवलं गेलं आणि या कालावधीत वणी शहरासोबत संपूर्ण यवतमाळ जिल्हा कार्यक्षेत्र करून संस्थेच्या वणी, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा व यवतमाळ येथे शाखा कार्यरत आहे व उमरखेड शाखा प्रस्तावित असून लगतच्या जिल्ह्यात आणखी शाखा उघडण्याचा मानस आहे. प्रगतीकडे वाटचाल होत असतांना कार्यविस्तार अधिक सुनियोजित पद्धतीने व्हावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व सर्व सोयीने सुसज्ज अशी केशवस्मृती या नावाने आपल्या संस्थेची मुख्य कार्यालयाची वास्तू पूर्णत्वास आलेली आहे.आपल्या ‘केशवस्मृती’ या मुख्यालयाची वास्तू सर्वसामान्यांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे.केशव नागरी’ या पतसंस्थेचे”केशवस्मृती” या सुसज्ज मुख्यालयाचा लोकार्पण सोहळा बुधवार 27.सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्यात सुनिल देशपांडे (रा.स्व.सं.अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख)यांच्या शुभ हस्ते “केशवस्मृती” या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून विवेक जुगादे (सहकार भारतीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश महामंत्री)हे उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्षस्थान पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड हे असणार आहे तर कार्यक्रमाचा प्रमुख अतिथी म्हणून हंसराज अहिर(भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष),मदन येरावार (आमदार, यवतमाळ विधानसभा क्षेत्र), आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, बंडू भागवत (रा, स्व. संघाचे तालुका संघ चालक)नाना चव्हाण (सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक) व तारेंद्र बोर्डे (भाजपचे जिल्हा अध्यक्ष)यांची उपस्थिती असणार आहे.
केशवस्मृती मुख्यालयाच्या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याच्या नियोजन अध्यक्ष चंद्रकांत खोंड, उपाध्यक्ष दौलत वाघमारे, सचिव अनिल अक्केवार, संचालक प्रा. डॉ.गजानन अघळते, सतीश कुलदिवार, अनिल रईच, अरुण कावडकर, किसनलाल खुंगर, प्रदीप राशतवार, विलास लाखे, सुधीर डांगरे, कविता इंगोले, कल्पना गुंडावार, दिपक दिकुंडवार मुख्य कार्यकारी अधिकारी, गणपत अतकरे (सहसंचालक) व विनय कोंडावार करत आहे.