“त्या….कोळशाच्या चोर बाजारात आरोग्यही धोक्यात.
माणिक कांबळे /मारेगाव:- पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत बोटोनी येथील एका रेस्टॉरंटला लागूनच प्रशासनाच्या नाकावर टिचून कोळसाचा चोर बाजार भरविण्यात आल्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.Even after giving warnings, the action is zero. Where does the water die? “That… health is also in danger in the coal thief market.
मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या बोटोनी येथील एका धाब्याला लागूनच कोळशाचा चोर बाजार भरविण्यात आला आहे. या चोर बाजारात वणी एरिया एकोना एरिया येथील ट्रक कोळशाची चोरी करून बाजारात विक्रीसाठी आणले जातात. तो ढाबा हा वाहतूक दाराच्या जेवणावळी साठी फेमस असल्यामुळे या धाब्यावर मोठया प्रमाणात वाहन चालक, मालक तथा विशेष ग्राहक भोजनासाठी येत असतात मात्र गेल्या काही महिन्यापासून येथे कोळसा माफियानी कोळशाचा चोर बाजार भरवीला आहे. त्यामुळे कोळसाचा डस्ट जेवणातून शरीरात जात असल्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. कोळसा खणीतून तस्करी झालेल्या कोळसाची अवैध वाहतूक करून येथील धाब्याजवळच असलेल्या चोरबाजारात हा कोळसा आणला जातो या चोर बाजारात दर दिवशी 50-60 टन कोळशाचा अवैध व्यापार होत असतानाही आतापर्यंत ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठया प्रमाणात फोफावला आहे. या अवैध कोळसा डेपोत उतरत असलेल्या कोळसाचा डस्ट जेवणासाठी आलेल्या ग्राहकांच्या भोजनातून पोटात जात असल्याची तक्रार ग्राहकाकडून होत आहे.
हा अवैध डेपो चालकावर अजून पर्यंत कुठलीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.येथील परिसर प्रदूषण युक्त झाला असून येथील डेपोवरती कारवाई करावी अशी मागणी आता पेट घेत आहे.