•केगावचा “प्रणव” पोलीसांचा ताब्यात
अजय कंडेवार,वणी:- १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर २३ वर्षीय मुलाने अत्याचार केला. यात ती मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली.तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला रुग्णालयात दाखल केले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दि.6 जानें.24 रोजी करण्यात आला असून पोलिसांनी २३ वर्षीय युवकाला ताब्यात घेतले आहे.
सविस्तर माहितीनुसार १४ वर्षीय पीडित मुलगी ही मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असून ती शहरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तर पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी प्रणव महादेव राऊत हा तालुक्यातील केगाव (मार्डी) ता.मारेगाव, जिल्हा.यवतमाळ येथील रहिवासी आहे.
गेल्या काही एक वर्षापासून दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली. नंतर दोघांचे प्रेम संबंध जुळले. त्यानंतर नेहमीच आजोबांच्या गावाला आली की, पिडितेला धमकावून २३वर्षीय प्रणव राऊत हा अत्याचार करत असल्याचा आरोप केला आहे. मात्र यामुळे काय घडेल त्याची कल्पना दोघांना नव्हती. त्यातच अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखू लागले.उपचारासाठी तिला घरच्यांनी वणी रुग्णालयात नेले असता, पीडित मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर घरच्यांनी विश्वासात घेत माहिती केली असता तिने घडलेला प्रसंग सांगितला.
दरम्यान, पालकांनी थेट मारेगाव पोलिस स्टेशन गाठले व पिडीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रणव महादेव राऊत (23) रा. केगाव (मार्डी) विरुद्ध कलम 376 (1),(A), 376 (2)(J)(N), 50 भादवि सहकलम 3(A), 4,5 (J)(ii), 5 (I), 6 बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून याचा अधिक तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.