- •तालुक्यात आत्महत्याचे सत्र थांबता….. थांबेना…!!!!
- •जनहित कल्याण संघटनेकडुन जनजागृती
नागेश रायपुरे, मारेगाव:- तालुक्यात शेतकरी आत्महत्याचे सत्र थांबता थांबत नसुन, होत असलेल्या आत्महत्यांच्या सततच्या घटनेमुळे प्रशासना सह अवघा तालुका हादरला आहे.मात्र तालुक्यात आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन सपेशल फेल ठरत असतांना नेहमी सामाजिक कार्यात अववल असलेली येथील जनहित कल्याण संघटनेच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जनजागृती करत तालुक्यातील पांढरकवडा (पिसगाव) येथील गोलर या शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला पन्नास हजाराची मदत करून त्यांना आधार दिला.
पुर्वीच होत असलेली सततची नापिकी त्यातच कर्जाचा वाढता डोंगर, मुलां मुलींचे शिक्षण,विवाह आदी कारणास्तव शेतकरी बांधव आर्थिक विवेचनात असतांना गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पुर परस्तीती मुळे अखे शेतजमीन पाण्या खाली येवून पशुधना सह शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.मात्र प्रशासन कडून आता परंत नुकसान भरपाई ची कुठलीच मदत मिळाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने तालुक्यात शेतकरी आत्महत्याच्या सततच्या घटना घडत असुन गेल्या आठवड्यात तर चक्क सात शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याचे जळजळीत वास्तव तालुक्याचे आहे.
मात्र यावर आत्महत्या रोखण्यासाठी प्रशासन सपेशल फेल ठरत असतांना अश्यातच येथील जनहित कल्याण संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.शेतकरी बांधवानो आत्महत्या करू नका आत्महत्या करण्यापूर्वी एकदा आमच्याशी संपर्क करा.असे गावा गावात जनजागृती रथ फिरवून असे पत्रक वाटण्यात येत आहे.अश्यातच तालुक्यातील पांढरकवडा येथील सुधीर रवींद्र गोलर या 28 वर्षीय अविवाहित युवा शेतकरी पुत्राने विष प्राशन करुन आत्महत्या केली.या दुर्दैवी घटनेमुळे कुटूंबातील कर्ता काळाच्या पडद्याआड गेल्याने गोलर कुटूंबाला आधार म्हणून जनहित कल्याण संघटनेच्या वतीने मृतकाची विधवा आई लिलाबाई गोलर लहान भाऊ यांना दहा हजार नगदी स्वरूपात तर चाळीस हजार रुपयांची एफडी असे एकूण पन्नास हजार रुपयांची मदत करुन त्या आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला आधार दिला.
यावेळी जनहित कल्याण संघटनेचे संस्थापक गौरीशंकर खुराणा,रवी पोटे,नंदेश्वर आसुटकर,अंकुश माफुर,रामभाऊ सिडाना,काशिनाथ खडसे,प्रमोद रिंगोले,प्रफुल उरकुडे,धीरज डांगाले आदी उपस्थित होते.