•शहरात L.C.B व D.B कारवायाचा जणू स्पर्धाच सुरू
•L.C.B टीममध्ये ” S…”फॅक्टर अक्टिवच
•मात्र महादेव नगरीतील “त्या फरारचा” शोdhaat अद्यापही “हिरा”…गुलदस्त्यातच
अजय कंडेवार,वणी :– राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही वणी शहरात मात्र खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. स्थानिक गुन्हे शाखेने साने गुरुजी नगर फाले ले-आउट वणी येथील परिसरात काल सकाळी 2 लाख 63 हजार 670/- रुपये चा रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला असून याप्रकरणी एकास अटककरून त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
परिसरात गुटखा विक्री पूर्ण बंद असल्याचा दावा संबंधित खात्याच्या अधिकार्यांकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळे असल्याचे दिसत आहे. राज्यात गुटखा विक्री व उत्पादनाला पूर्ण बंदी आहे.मात्र वणी तालुक्यात खुलेआम दररोज लाखो रुपयांचा गुटखा विक्री होत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची आयात केली जाते हेही मागील महादेव नगरीतील पाण्याचा टाकीजवळ झालेल्या एका कारवाईत उघड झाले आहे. मोठ्या गुटखा विक्रेत्यांकडून हा गुटखा छोट्या विक्रेत्यांना विकला जातो. संबंधित खात्याला याची कल्पना असतानाही गुटखा विक्रेत्यांविरुद्ध जाणीवपूर्वक कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. असे म्हणायलाही काहीं हरकत नाहीं.अश्यातच स्थानिक गुन्हे विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे यांचा अनेक कारवायाने अवैध धंद्याला आळा बसणार त्यात काहीं शंकाच नाही. त्यातीलच एक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने साने गुरुजी नगर फाले ले-आउट वणी येथील परिसरात आरोपी मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलकर (वय ३४ वर्ष ) रा. वार्ड क्रमांक ६ फाले ले-आउट साने गुरुजी नगर वणी याला ताब्यात घेतले. तसेच अन्न सुरक्षा अधिकारी घनश्याम दंदे अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यवतमाळ यांनी आरोपी नामे मुनाल उर्फ मुन्ना नवनाथ बेलकर यांचे विरुद्ध पोस्टे वणी येथे अन्न व औषध सुरक्षा कायद्याअंतर्गत विविध गून्हे दाखल करण्यात आले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ.पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुश जगताप, प्रदीप परदेशी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि योगेश रंधे,उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधीर पांडे,नरेश राउत सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.