★ जप्तीत नेहमी कोंबडेच गायब ? यातही गाबा ?, कारवाईत मात्र स्पष्ट संशय….
★विशेष मारेगाव कोंबड बाजारासाठी “हब ” ठरताहेत.
अजय कंडेवार, वणी:– शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लाठी शिवार व पिंपरी जंगल शिवार येथे वेगवेगळया ठिकाणी लपून छपून सुरू असलेल्या कोंबड बाजारावर शिरपूर पोलिसांनी धाड टाकून पाच व्यक्तींना अटक करून आणि लाखोंचा उलाढाल होणाऱ्या बाजारात माञ दोन हजाराचा रू.चा वर असा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आहे.
सविस्तर वृत्त असे की, 26 नोव्हें. रोजी जंगलात कोंबडयाची झुंज लावुन त्यावर पैसे लावून काही व्यक्ती हारजीतीचा जुगार खेळत आहेत अशी गोपनीय माहिती शिरपूर ठाणेदार यांना मिळताच, दोन वेगवेगळे चमू तयार करण्यात आले व कोंबड बाजार सुरू असल्याची चुणूक लागत असल्याचा ठिकाणी धाड मारली असता . त्या दोन वेगवेगळया ठिकाणावरून कोंबडयांचा झुंझीवर पैसे लावुन हार-जीतचा जुगार खेळत होते. तेव्हा त्या 5 जणांना जागीच ताब्यात घेतले व खाकी दाखविताच असता त्यांनी नावे सांगण्यास सुरूवात केली. पहिल्या कारवाईत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याची नावे दिपक वारलू तेलंग वय 25 वर्ष रा. बेसा ,सुरेद्र किसन पिंपळकर (वय 38 वर्ष), रा. चिखली, तर दुसऱ्या कारवाईत शालीक नामदेव तुरणकार वय 38 वर्ष रा. नेरड (पु),संतोष तुकाराम टेकाम (वय 35 वर्ष) रा. नेरड (पु),जावेद कालु शेख (वय 51 वर्ष)रा. नेरड (पु). असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचे नावे आहे.या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.