अजय कंडेवार,Wani :- विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजल्यानंतर, साधारणपणे सर्वच राजकीय पक्षांनी बहुतांश मतदार संघांतील आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यानंतर आज अनेक ठिकाणी विविध पक्षांचे उमेदवार आपापले उमेंदवारी अर्ज दाखल करताना दिसत आहेत. यातच आज २५ ऑक्टोबर २०२४ रोजी भव्य शक्ती प्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. वणी उपविभागीय कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी ८ वाजता वणी येथील शासकिय मैदानावर सभा आयोजित करून ते मतदारांचा आशीर्वाद घेणार आहेत.

या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, पदाधिकारी यांच्यासह वणी, मारेगाव व झरी या तिन्ही तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सभेनंतर रॅली काढण्यात येवून राजु उंबरकर हे समर्थकांसह नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. राजु उंबरकर यांच्या उमेदवारीने पक्षात चैतन्य निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी मतदारांच्या भेटी गाठीत आणि प्रचारात आघाडी घेतली आहे तर सोशल मीडियाच्या माध्यामतून उंबरकर यांच्या नावाला सर्वाधिक पसंती पहावयास मिळत आहे.यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवारी आयोजित सभेस व रॅलीत समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
•उंबरकर सातत्याने जनसेवेत अग्रेसर…..
” २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये वणी विधानसभा मतदारसंघासाठी उंबरकर यांनी नशीब आजमावले २००९ साली पक्ष नवखा असताना सुद्धा मतदारांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला होता. उंबरकर सातत्याने जनसेवेत अग्रेसर असून मतदारसंघांतील विविध समस्यांना घेऊन ते आक्रमक भूमिका घेतात. तर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यासाठी त्यांचे नाव आघाडीवर असते त्यामुळे या गोष्टींचा फायदा या निवडणूकीत होणारं असल्याचे सद्यस्थितीत बोलले जात आहे. “

