•येणाऱ्या अडचणीसंबंधी सहकार्य करण्याची विनंतीही..
अजय कंडेवार,वणी :- श्रीराम नवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईद यासारख्या सण उत्सवानिमित्ताने शांतता समितीची बैठक काल दिं.24 मार्च 2023 शुक्रवार रोजी सायं.ठीक 6 वाजता पोलीस स्टेशनच्या प्रांगणात संपन्न झाली.In the background of the upcoming festival, the meeting of the peace committee was concluded
यावेळी बैठकीस उपस्थित नागरिकांनी, विविध संघटनेचा पदाधिकारी काहीं मुद्दे उपस्थित केले. त्यात रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या दुचाक्या तसेच चारचाकी , रमजान महिन्यात विद्युत खंडित न होण्याबाबत सकारात्मक चर्चाही संबधित अधिकाऱ्यांशी करण्यात आली.येत्या श्रीराम नवमी या साजरा करण्याबाबतही चर्चा करण्यात आली त्यात निघणारी रॅली ,त्याचे नियोजन व शहरातील काहीं ठिकाणीं खड्डे बुजविण्यासाठीही समितीने नगरपरिषदचा अधिकाऱ्यांशी मागणीही केली असे अनेक विषय मांडले तसेच यावर उपाययाेजना करण्याची मागणी केली़.पोलीस प्रशासनाकडून सहकार्याची भूमिका राहील असे आश्वासीत केले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये,शांतता, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तालुक्यातील ग्राम प्रमुख,ग्रामसुरक्षा दल आणि पोलीस पाटलांनी सजग रहावे. कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना माहिती द्यावी. अशीही माहिती वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांनी दिली.In the background of the upcoming festival, the meeting of the peace committee was concluded
यावेळी तहसिलदार निखिल दुर्धर, ठाणेदार प्रदिप शिरस्कर, वाहतूक शाखा प्रमुख संजय आत्राम, MSEB विभागाचे अधिकारी, नगरपरिषदचे अधिकारी ,विविध पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार , शांतता समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. या बैठकीचा यशस्वीतेसाठी पोलीस विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.