विदर्भ न्यूज,वणी:- रोटरी क्लब ऑफ डायमंड सिटी वणी तर्फे एस बी हॉल येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभक्तीपर गीतांवर आधारित आंतरशालेय नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत वणी शहरातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत गट अ व गट ब या दोन्ही गटात वणी पब्लिक स्कुलच्या चमूने तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यार्थ्यांच्या या यशात शाळेच्या शिक्षिका शुभांगी बल्की, प्रनोती खडसे, वंदना बाविस्कर तसेच अर्चना पाटील या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा तसेच प्राचार्या ज्योती राजूरकर यांनी विजेत्या चमूचे कौतुक केले.
आंतरशालेय नृत्य स्पर्धेत वणी पब्लिक स्कूलचे सुयश…
RELATED ARTICLES