•वणीत महिला कांग्रेसचे जोडे मारो आंदोलन.
अजय कंडेवार,वणी:- भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील वादग्रस्त ध्वनी चित्रफितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून महिला काँग्रेस तर्फे सोमय्यांविरोधात बुधवार (दि.19) छञपती शिवाजी महाराजाचा पूर्णाकित पुळ्यासमोर महिला काँग्रेसचा वतीने “जोडे मारो आंदोलन” करण्यात आले.Why is the woman leader of BJP silent on the obscene leader?Jode Maro movement of Vanit Mahila Congress.

वणीत पावसाचा हाहाकार महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष वंदना आवारी यांच्या नेतृवात हे आंदोलन करण्यात आले. नैतिकतेचा मक्ता मिरवणाऱ्या भाजप च्या या सोमय्या बद्दल राज्याचे भाजप चे नेते काही बोलणार आहे की नाही? आणि भाजप च्या काही नेत्या बोलणार आहे की नाही? सतत महिला अत्याचारावर अनेकदा बोलणारे आता ते कुठे? याबाबत काय प्रतिक्रिया आहे?? असेही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी महिला काँग्रेस चा वतीने करण्यात आली.
आंदोलन करते वेळी संध्या बोबडे, सविता ठेपाले, साधना गोहोकार, शारदा ठाकरे, कविता चटकी, संगीता खाडे, उज्चला दोडके, प्रमिला पावडे, माया गाडगे, वंदना धगडी, संगीता संजय खाडे, शालीनी रासेकर, विजया आगबत्तलवार, ललीता बरशेटटीवार, माया जयपुरकर यांचेसह अनेक महिला उपस्थित होत्या.

