फाल्गुन गोहोकार वाढदिवस विशेष लेख………
अजय कंडेवार, वणी:-
“जसा निजनतेच्याअति खळखळाट ।।,असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा । विना नाद वाहे जशी गंगाधारा ॥”
राजकारणाच्या चळवळीत अनेक प्रकारचे नेते असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत वहात अवघा वणी तालुका चिंब करणारा एक युवा जर कोण असेल तर, ते मनसेचा धडाकेबाज तालुकाध्यक्ष फाल्गुनभाऊ गोहोकर आहे. शांत, संयमी, मितभाषी, प्रसंगी आक्रमक, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून फाल्गुन भाऊ गोहोकार यांचे सर्वसामान्य नावलौकिक आहे.
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करताना पाठीवर थाप मारून बळ देणाऱ्या नेत्यांची गरज असते. असेच एक मनसेचे नेते राजूभाऊ उंबरकर यांनी अनेक कार्यकर्त्यांना त्यांचा शिकवणीतून घडविले. त्यांचाच वारसा म्हणून वणी तालुक्याचे अध्यक्ष फाल्गुनभाऊ गोहोकार यांनी जपला आहे. प्रचंड ध्येयवाद, अविरत कष्ट करण्याची तयारी, सामान्य माणसांविषयी वाटणारी कणव, आव्हानांना तोंड देण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीत त्यांनी जनमाणसांत वेगळे स्थान निर्माण केले आहे. राजूभाऊ उंबरकरांचा एक युवा “ढाण्या वाघ ” व “विश्वासू ” म्हणूनही विशेष परिचित आहे. अवघ्या दोन वर्षांत हजारोंचा संख्येने प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करून देणारा एकमेव तालुकाध्यक्ष म्हणुनही पक्षात विशेष ओळखं….
अनेक युवकांच्या समस्या जाणणारा युवा नेता म्हणुन फाल्गुन भाऊंचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कोणतेही काम हातात घेतांना, सुरु करतांना होणारे फायदे-तोटे, दुरगामी परिणाम यांचा विचार करुन सखोल अभ्यास करुन कामास सुरुवात करण्याची खास हातोटी भाऊंकडे आहे. याचा अनुभव अनेकांनी खुप जवळुन घेतला आहे.फाल्गुन भाऊंनी मनसे नेते राजूभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या विविध प्रश्नांवर समस्येवर आवाज उठवुन न्याय दिला आहे.मग शेतकऱ्यांचे प्रश्न असो,सामान्य नागरिकांचे प्रश्न असो की, विद्यार्थ्यांचे प्रश्न असो हे सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणाऱ्या, लोकांच्या हितासाठी राजकारण, कोणताही भेदभाव न करता प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवणाऱ्या, नेतृत्वाने वणी तालुक्यातील युवकांच्या हृदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे. या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस.
तालुक्यातील लोकांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. अनेक युवकांना विश्वासात घेऊन त्यांना बळ देण्याचेही ते काम करतात. पाणी, रस्ता व आरोग्याच्या प्रश्नासोबतच त्यांनी भर दिला आहे. विशेषतः कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांचा पाठीवर थाप मारून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य सर्वांचे लाडके नेते राजू भाऊ उंबरकर यांनीच केले आहे. त्यामुळे वणी तालुक्यात फाल्गुन गोहोकार हा धडाकेबाज युवक देखील तरुणांचे आशास्थान बनले आहेत. त्यातूनच आश्वासक आणि प्रेरक नेतृत्वाची साक्ष जनतेला पटली आहे. फाल्गुन भाऊ यांच्याकडून जनतेला फार मोठ्या अपेक्षा आहेत. सामान्य जनतेच्या कसोटीवरही ते यशस्वी ठरो आणि नेतृत्व करो, हीच वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा…