Tuesday, February 17, 2026
HomeBreaking Newsअरेच्चा...वणी भाजपाला आणखी मोठं भगदाड ...

अरेच्चा…वणी भाजपाला आणखी मोठं भगदाड …

•भाजपचे माजी नगरसेवकांची जंगी Entry "शिंदे गटात". •"चोरडिया vs बोदकुरवार"अशी नवी टक्कर?

Ajay Kandewar,Wani:- वणी तालुक्यात आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. दि.15 नोव्हें.चा रात्रीला भाजपातील अनेक युवकांसह माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे “अत्यंत खास” मानले जाणारे निखिल खाडे यांनी भाजपला Bye – Bye म्हणत धनुष्यबान हाती धरले तसेच आता 16 नोव्हें.रोजी थेट भाजपचे नगरसेवक निलेश होले ,भाजपचे काही माजी नगरसेवक व भाजप कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजपाला आणखी धक्का पोहोचला.विशेष म्हणजे, या घडामोडीनंतर “भाजपावर आणखी संकट गडद का?” असा प्रश्न उपस्थित झाला .

विजय चोरडिया यांनी अलीकडेच भाजपाचा त्याग करत शिंदे गटात प्रवेश केला. भाजपातील काही कार्यकर्तेच भाजपाला नुकसान पोहोचवत आहे. हे या भाजप फळीतील जंगी प्रवेशाने स्पष्ट दिसत आहे. नगरसेवक निलेश होले, माजी नगरसेवकांची भाजप फळी व इतर काही कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटात उत्साहाचे वातावरण आहे. वणी तालुक्यात राजकीय चित्र झपाट्याने बदलत असून शिंदे सेना व भाजपामध्ये उघड टक्कर सुरू झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. भाजपाचे माजी नगरसेवक, विद्यमान नगरसेवक आणि युवा फळीचा मोठा हिस्सा थेट शिंदे सेनेच्या धनुष्यबाणात प्रवेश करत असल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे, या घडामोडींमुळे वणीत “भाजप विरुद्ध शिंदे सेना” एवढंच समीकरण उरले नाही तर, नगरपरिषद निवडणूकित “विजय चोरडिया वर्सेस माजी आमदार बोदकुरवार” अशी थेट टक्कर निर्माण होत असल्याचे बोलल्या जात आहे.एकामागून एक होणारे प्रवेश पाहता, येईल निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने वणीत जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments