Ajay Kandewar,Wani:- वणी- मारेगाव रस्त्यावरील रुक्मिणी कोल वॉशरीमध्ये परिसरातील, विशेषतः निंबाळा गावातील, बेरोजगार तरुणांना रोजगारात प्राधान्य द्यावे, कोल वॉशरीमुळे होणाऱ्या कथित प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवावे, तसेच वॉशरीसमोर मुख्य रस्त्यावर अवजड वाहने (ट्रक) उभी राहत असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळावेत, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने येत्या ८ एप्रिल रोजी” रास्ता रोको “आंदोलन पुकारण्यात आले. परंतु शिवसेनेचाच यवतमाळ जिल्हा सह संपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांनी या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा नाही किंवा सहभागही नसल्याचं एका लेखी संदेशद्वारे सिद्ध झाले.या आंदोलनाला भोंगुर लागल्याचे चित्र 7 एप्रिल रोजी SDO,ठाणेदार यांना पाठविण्यात आलेल्या लेखी स्वरूपाचं संदेशद्वारा दिसून आलें.
Shivsena शिंदे गटातून यवतमाळ जिल्हा सह संपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांनी ८ एप्रिल रोजी” रास्ता रोको “ला शिवसेनेचा कुठलाही समर्थन नसल्याचे पाठविण्यात आलेल्या लेखी स्वरूपाचं संदेशद्वारा
SDO, वणी ठाणेदार व व्यवस्थापक , रुक्माई कोल वॉशरी.यांना पाठविले. या लेखी स्वरूपाचं संदेशनी दुफळी असल्याचं स्पष्ट चित्र उघड झाले.
वाचा….. ( यवतमाळ जिल्हा सह संपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांचे लेखी स्वरूपाचं संदेश…….
प्रति, मा. उपविभागीय अधिकारी ( महसूल )तथा न्याय दंडाधिकारी वणी.
दिनांक 8/4/2025 ला यवतमाळ रोड वर असलेल्या रुक्माई कोल वॉशरी समोर होत असलेल्या रस्ता रोको आंदोलनास शिवसेनेचा कोणताही पाठिंबा किंवा सहभाग नसून हे आंदोलन एका विशिष्ट हेतूने ( Wasted interests ) केले जात आहे, भर कडक उन्हात असे रास्ता अडवून प्रवाश्यांना त्रास देणे कितपत योग्य आहे . आणी उन्हात रस्ते अडवून आम्ही काय साध्य करणार आहो , हेच काम मागण्यांचे निवेदन देऊन किंवा पत्रव्यवहार करूनही करता आले असते , S. T. बसेस आणी खाजगी बसेस अडवून जनतेला वेठीस कशाकरिता धरायचे , अशा रस्ता अडविल्याने एखाद्या प्रवाश्याचा उन्हामुळे पाणी न मिळाल्याने मृत्यू झाला तर आयोजक किंवा आंदोलक जवाबदारी घेतील का ? यामागे आयोजकांचा हेतू काय आहे असा प्रश्न जनता आणी स्थानिक पदाधीकारी करीत आहे .
मागील 21 वर्षांपासून भाटिया आणी आता रुक्माई कोल वॉशरी सुरु असून आता प्रदूषणा चा प्रश्न निर्माण झाला आहे का ? वॉशरी मधे आज रोजी ऑफिस आणी फिल्ड मिळून जवळपास 450 ते 500 लोक काम करीत आहेत , व 65% ते 70% कामगार परिसरातील स्थानिक आहेत. त्यामुळे हे रस्ता रोको आंदोलन उचित नसून अयोग्य आहे, विशिष्ट हेतूने प्रेरित आहे. म्हणून ह्या रस्ता रोको ला शिवसेनेचा पाठिंबा नाही किंवा सहभागही नाही.जय महाराष्ट्र 🙏🙏आपला नम्र , विनोद मोहितकर , शिवसेना ( शिंदे )यवतमाळ जिल्हा सह संपर्क प्रमुख ( वणी विधानसभा क्षेत्र )
दिनांक : 07/04/2025
प्रतिलिपी : 1) मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ ,2) मा. ठाणेदार, पोलीस स्टेशन वणी, 3) व्यवस्थापक , रुक्माई कोल वॉशरी.

