•’या ‘आमदाराने घेतला आक्रमक पवित्रा.
अजय कंडेवार,वणी:- वणी क्षेत्र व वणी नार्थ क्षेत्र द्वारा उकणी गावाच्या सभोवताल टाकलेल्या ओबी च्या ढिगार्यामुळे गावाला संभाव्य पुराची भीती निर्माण झाली आहे.गावापासुन उर्वरीत शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग, उकणी गावा वरुण वणीला व घुग्घुस ला जाण्याचा सार्वजानिक बांधकाम विभागाचा मार्ग पावसाळ्यात बंद होण्याची भिती, गावासभोवताल असलेल्या ओबीमुळे गावात होत असलेल्या धुळीच्या प्रदूषणाबाबत व वेकोलीच्या काटेरी बाबळीमुळे विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामपंचायत उकणीद्वारा वणी विधानसभेचे सन्मानिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना दि.15 मे. रोजी गावाच्या समस्याबाबत निवेदन देण्यात आले होते.Else.. opencast work stop.This MLA took an aggressive stunt.
दिलेल्या निवेदनाची आमदार यांनी तात्काळ दखल घेत दि.22 मे. रोज सोमवार ला सायंकाळी 5 वाजता थेट उकणी ग्राम पंचायत कार्यालय मधे समस्या जाणून घेण्यासाठी व मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित केली या बैठकिला माजी जी.प. सदस्य विजय पिदुरकर , तहसीलदार निखिल धुळधर ,वणी नार्थ क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्रीवास्तव ,वणी क्षेत्राचे क्षेत्रीय उपमहाप्रबंधक प्रमोद कुमार,निलजई चे उपक्षेत्रय प्रबंधक अतुल सिंह,उकणीचे उपक्षेत्रय प्रबंधक राजेंद्र कुमार ,सार्वजनिक बांधकाम वणी उपविभाग़ाचे उप अभियंता व सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.सभेमधे सुरुवातीला उकणीचे सरपंच सचिन खाडे यांनी आमदार समोर मानव निर्मीत ओबी डंपिंगमुळे गावाला कसा पुराचा धोका निर्माण झाला तसेच उकणी गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी कश्या अडचनी निर्माण झाल्या तसेच उकणी पासून वणी व घुग्घुस ला जाणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मुख्य रस्ता ओबी डंपिंग मुळे पावसाळ्यात का बंद होण्याच्या मार्गावर आहे व ओबी च्या धुळी मुळे गावकर्याना होत असलेल्या त्रासाबद्दल व वारंवार विज पुरवठा खंडित होणाऱ्या ह्या सगळ्या समस्याचा पाढाच वाचला. आमदार तात्काळ वेकोली अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व 5 जून पर्यंत संपूर्ण समस्या मार्गी लावन्याचे आदेश दिले अन्यथा उकणी व निलजई खुल्या खदानीचे काम बंद करण्याचा गर्भित इशारा वेकोली अधिकाऱ्यांना दिला व उकणी गावाच्या पुनर्वासनाची समस्या तातळीने मार्गी लावण्याचे आदेश दिले.
यावेळी बैठकीला उकणीचे सरपंच सचिन खाडे, पिंपळगावचे सरपंच दिपक मत्ते, उकनीचे उपसरपंच नरेंद्र बलकी, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिवरकर, उज्वला धांडे, कविता शेन्द्रे,आचल रोडे, तंटा मुक्ति अध्यक्ष रामदास क्षीरसागर,पो.पाटिल नत्थू खाडे व मोठ्या संखेने गावकारी उपस्थित होते.