•पण या प्रकरणाला “हवा “देणारेच “हवेत “
•इस पिक्चर का “वो डायरेक्टर” कब आयेगा सामने.
अजय कंडेवार,वणी:- नवजात बाळ प्रकरणी डॉ.महेंद्र लोढा यांना काहीजण सतत पैश्याची मागणी करून मानसिक त्रास देत असल्याचा पुराव्यासहित डॉ. महेंद्र लोढा यांनी दि.4 सप्टें.रोजी पोलिस स्टेशन गाठत रितसर निवेदन दिलें व काही पुरावेही पोलीस निरिक्षक अजित जाधव यांना सुपूर्द केलें. या पुराव्यांची प्रथमतः शहानिशा करण्यात आली व डॉक्टर महेंद्र लोढा यांच्या बयानावरून बाळाचे वडील नरेंद्र शंकर बुजाडे व बाळाची आजी कौशल्या शंकर बुजाडे यांच्या विरोधात (दि.5 सप्टेंबर) मंगळवार रोजी.सायं 9 वाजता वणी पोलीस स्टेशन येथे रितसर तक्रार दाखल करण्यात आली.Finally… a case has been filed in the police station against the 2 extortionists.
दिलेल्या तक्रारीत बाळाचे पालक नरेंद्र शंकर बुजाडे व बाळाची आजी कौशल्या शंकर बुजाडे यांनी खोटे आरोप लावत या प्रकरणी पोलीस ठाण्यात डॉ. लोढा यांचा विरोधात तक्रार दाखल केली त्यानंतरही वारंवार नवजात बाळाचा पालकांनी 25 लाखांची खंडणी मागितले परंतु पैसे न दिल्यामुळे त्या नवजात बाळाच्या पालकांनी “आणखी काहींना” घेऊन बदनामी ,धमकी, ब्लॅकमेलिंग व एक मोठे षडयंत्रच रचल्याचा आरोप डॉ.लोढा यांच्या तक्रारीत करण्यात आला आहे. विशेषतः डॉ.लोढा यांनी नवजात बाळाचा पालकांना पैसे देण्यास नकार दिल्याने पालकांनी सोशल मीडियात अनेकदा बदनामी केली यामुळे मानसिक त्रास वाढत जात होता व वैद्यकीय क्षेत्रात होणाऱ्या बदनामीमुळे व्यावसायिक नुकसान होत असल्याचे लक्षात येताच डॉ. महेंद्र लोढा यांनी पुरव्यासहित नवजात बाळाचे वडील नरेंद्र शंकर बुजाडे व बाळाची आजी कौशल्या शंकर बुजाडे यांच्या विरोधात दि.5 सप्टेंबर रोजी रितसर तक्रार दाखल करताच वणी पोलीस स्टेशन येथे नरेंद्र बुजाडे व कौशल्या बुजाडे या दोघांविरोधात भा.द.वी कलम 384,385,501,506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.
⚫काय आहे कलम 34 …….!⚫
“या कलमांतर्गत पोलीस अटक वॉरंटशिवाय एखाद्याला अटक करू शकतात. मात्र, या प्रकरणात जामीन देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. पोलिसांना नाही. एखादा आरोपी इतर कुणासोबत मिळून सामान्य हेतूने गुन्हा करतो, तेव्हा त्या व्यक्तीवर कलम 34 अंतर्गत कारवाई होते.”यामुळे जो कोणीही या प्रकरणातील षडयंतत्राचा मागे आहेत त्या सर्वांना शोधण्याचे आवाहन पोलिसांना आहे. तसेही शहरात एक खंडणी खोरांची टोळीच सक्रिय आहे. त्यांची नावे लवकरात लवकर जनतेसमोर आणून त्यांचे पितळ उघडे पडलेच पाहिजे अशी आर्त हाक जिल्हयातील समस्त डॉ. संघटनेची आहे.
” या नवजात बाळ प्रकरणाला “हवा ” देणारे मात्र “हवेतच”असेही दिसून येत आहे.पोलिसांसमोर “मुख्य सूत्रधार” शोधण्याचे आवाहन उभे झाले आहे. अवघ्या पहिल्या दिवसापासूनच या प्रकरणात “तो” कोण? अशी चुणूक होतीच परंतु “तो”शेवटपर्यंत डायरेक्टरच बनून असल्याचे या प्रकरणात दिसत आहे.” तो” चित्रपट बनविनारा शेवटी “सिनेमा हॉल(ठाण्यात)”मध्येच दिसेल का? अशीही जनमानसात खमंग चर्चा सुरू आहे. परंतु एका देवानंतर कोण असेल तर ते डॉक्टर असे म्हटल्या जाते परंतु डॉक्टरांना नाहक त्रास देण्याचा हा अशोभनीय प्रकार आहे. अश्या प्रकारचा सर्वत्र जोरदार निषेधही करण्यात येत आहे.”