•अमरावती रेक्यू टीमने डार्ट करून वाघाला बेशुद्ध करीत केले पिंजराबंद
अजय कंडेवार,वणी: तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील कोलेरा परिसरात धुमाकूळ घालून दोन व्यक्तींना ठार करून अनेक पाळीव जनावरांची शिकार करणाऱ्या वाघास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
वरिष्ठ स्तरावरून वाघाला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने वनविभागाचे 40 कर्मचारी मागिल 9 दिवसापासून पाळत ठेवून होते अखेर आज दिनांक 7 डिसेंबर रोज बुधवारला सकाळी 10.00 वाजता वेकोली कोलार पिंपरी खदान जवळील 1 किमी अंतरावर मुक्त संचार करतांना अमरावती रेस्क्यू टीमने डार्ट करून वाघाला बेशुद्ध करीत पिंजराबंद करण्यात रेस्कु टीमला यश आलें. तसेच वाघाचा पंचनामा सैनी, वासनिक आणि महांगडे यांनी केले त्यात त्याचे वजन 150 किलो. व वय अंदाजे 2 वर्षाचावर आहे अशी माहिती मिळाली. त्यात वैद्यकीय तपास डॉ. मराठे हे होते.
तालुक्यात नरभक्षी वाघाने धुमाकुळ घातला आहे. वेकोली परिसरात प्रंचड दहशतीचे वातावरण पसरले आहे. नुकत्याच काही दिवसांपुर्वी रांगणा भुरकी येथील अभय देवूळकर या युवकाला ठार केल्यानंतर दि. 27 नोव्हेंबर रोजी रविवारला कोलार पिंपरी येथील रामदास पिदूरकर (58) यांचेवर हल्ला चढवला त्यात त्यांना जीव गमवावा लागला. तर ब्राम्हणी येथे टॉवरचे काम करणाऱ्या उमेश पासवान या मजुरांवर वाघाने हल्ला चढवला होता त्यात तो गंभीर जखमी झाला होता
शेवटीं विविध भागातील वनविभाग कर्मचारीने’ तो ‘ नरभक्षक वाघ पकडल्याने शेतकरी व शेतमजूर यांनी एक सुखदायक श्वास घेतला. समस्त तालुक्यात वनविभागाचे कौतुक केल्या जात आहे. वनविभागाचा दिलेल्या माहितनुसार त्या वाघाला नागपूर येथे नेण्यात येणार आहे.