•सर्वांच्या लागले नजरा,मतदार ठरवणार वसंतचे भविष्य
• विजय सहकारचाच….!!!!!!!!
अजय कंडेवार,वणी – उपविभागातील वसंत जीनिंगच्या निवडणुकीत 17 संचालकांसाठी डझनभर उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली असून . यात राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन पॅनल आपापल्या पक्षाचे पॅनल टाकल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत वसंतचे भविष्य 10 हजार 924 मतदारांच्या हाती आहे.
वसंत जिनिंगचे माजी अध्यक्ष ऍड देविदास काळे यांनी आपले नेतृत्वात “जय सहकार पॅनलचे ” उभारणी करून यात समाजकारण व राजकारण अग्रेसर असणारे उमेदवार आहे . सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव ,व मुरब्बी राजकारणी दहा वर्षाचा वसंत जीनिंगच्या अध्यक्षपदाच्या अनुभवाने ऍड देविदास काळे यांनी जय सहकार पॅनलचे नेतृत्व करीत पुन्हा एकदा ही निवडणूक अस्तित्वाची केली आहे. कारण साडेसात हजार मतदार नवीन केल्याने त्यांच्या मतावर निवडणुकीत विजयाची घोषणा केली आहे. त्यामुळे जय सहकार पॅनल कडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे .
मतदारांवर विश्वास असल्याने ही निवडणूक आम्हीच जिंकणार असे सांगत असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . त्यामुळे या निवडणुकीत जय सहकार पॅनलचे उमेदवार विजय चोरडिया, राजाभाऊ पाठरडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, अमोल ठाकरे, मोहन जोगी, लुकेश्वर बोबडे, संजय पारखी, पुंडलिक भोंगळे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई ,नामदेव सुरपाम मेहनत घेत आहे.