Thursday, October 22, 2026
HomeBreakingसैदाबाद येथील शेतात गांजाची लागवड...

सैदाबाद येथील शेतात गांजाची लागवड…

Ajay,Wani :- वणी तालुक्यातील कायरजवळील सैदाबाद पोड येथे शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून सध्या घटनास्थळी तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सदर शेतात गांजाची लागवड नेमकी किती क्षेत्रावर करण्यात आली आहे, गांजाचे प्रमाण किती आहे आणि या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांची कारवाई सुरू असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे.या कारवाईत काय निष्पन्न होते, किती गांजा आढळतो आणि पोलिसांच्या तपासात कोणती माहिती समोर येते, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अधिकृत माहिती उपलब्ध होताच पुढील वृत्त प्रसिद्ध करण्यात येईल. सध्या एक आरोपी यामध्ये मिळाला असल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page