Thursday, October 22, 2026
HomeBreaking Newsसाहेब...तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडून दंड वसूल करा अन् चोरीचा गुन्हा दाखल करा...

साहेब…तलाठी व मंडळ अधिकाऱ्याकडून दंड वसूल करा अन् चोरीचा गुन्हा दाखल करा…

•अख्ख झोला घाट चोरट्याने पोखरल यात "विवेक बुद्धि" कुणाची ? •जिल्हाधिकारीकडे होणार या प्रकरणाची विशेष तक्रार पुरव्यासहित.

Ajay Kandewar,Wani:- वर्धा नदीपात्रातील झोला घाटात जेसीबी व दोन टिप्परद्वारे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करण्यावरून शनिवारी मध्यरात्रीनंतर जेसीबी कंपनीची पोकलेन मशीन व रेती भरलेला एक हायवा (MH ४० एन ६६७०) जप्त केला व एका हायवा चालकाने तेथून वाहनासह पळ सुद्धा काढला. मात्र शोकांतिका ही की,झोला  येथील मंडळ अधिकारी आणि तलाठी मूंग गिळून का होतें. ही बाब त्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी मस्त “विवेक बुध्दी” लावली असावी असा ही अंदाज वर्तविण्यात येतं आहे . यावरून या प्रकरणाची दखल वणीतील समाजसेवक यांनी घेत थेट 11 एप्रिल रोजी तहसिलदार यांना पत्र देत यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांचा विरोधात वरिष्ठांना पत्र व्यवहार करून तात्काळ निलंबित करा व त्यांचावर शासनाचा तिजोरीला करोडोचा चुना लावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात रेती चोरीचा गुन्हा दाखल करून सहआरोपी करून दंड वसूल करावे अशी रास्त मागणी केली.

वणी तहसीलदार यांनी मध्यरात्री झोला घाटात धाड घातली त्यात एक मशीन व एक हायवा जप्त केला परंतु यात मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती असं कशावरून कारण अख्खं घाट त्या रेतीचोरट्यांनी पोखरलं तेही पोकलेन मशीन टाकून मस्त रेती चोरटे रेती तस्करी करत होतें. त्यात ते सुद्धा कानडोळा करत संबंधित अधिकारी चूप्प कसे बसले ? यातील “गौडबंगाल” लक्षात घेत वणी येथील समाजसेवक यांनी तहसिलदार यांना निवेदन देत यामधील यामधील तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबन करून त्यांच्यावर शासनाच्या तिजोरीला करोडोचा चुना लावत असल्याचे त्या पोखरलेल्या अवैध घाटात पडलेल्या खड्यातून सिद्ध होतेच.यामुळें आधी चोरीचा गुन्हा दाखल याच तलाठी व मंडळ अधिकारी यांचावर दाखल करून  सहआरोपी करा व त्या  अवैधरीत्या पोखरलेल्या झोलाघाटातील  मोजणी करून चोरी गेलेल्या रेती चा दंड यांच्याच कडून वसूल करावा अशी मागणी निवेदनातून केली. तसेच या मंडळ अधिकारी व तलाठी यांना चालविण्यात “विवेक बुद्धी ” कुणाची हेही शोधणे गरजेचे आहे. तेव्हाच शासन तिजोरी सुरक्षित राहील. तहसिलदार साहेब काय करतील याकडे आता लक्ष लागले आहे कारण यांना खुली छूट देतात की तलाठी व मंडळ अधिकारी यांना सुरक्षा देतात की कायदेशीर यावर कारवाई करतात हे बघणे गरजेचे आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page