Tuesday, October 20, 2026
HomeBreaking Newsशेतकऱ्यांच्या बोअरवेलवर बंदी, डोलोमाइट खाणींना मात्र परवानगी.....

शेतकऱ्यांच्या बोअरवेलवर बंदी, डोलोमाइट खाणींना मात्र परवानगी…..

Ajay,Wani : तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना शेतकऱ्यांना शेतात बोअरवेल खोदण्यास बंदी घालण्यात येत आहे; मात्र दुसरीकडे नवीन डोलोमाइट खाणींना परवानगी दिली जात असल्याने प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात खासदार प्रतिभाताई धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांचा मार्गदर्शनात युवक काँग्रेसचे वणी विधानसभा अध्यक्ष राहुल दांडेकर यांच्या नेतृत्वात झरीजामनी येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांना पाण्यासाठी निर्बंध आणि खाणचालकांना परवानग्या, हा दुजाभाव कशासाठी, असा सवाल उपस्थित करत नवीन डोलोमाइट खाणींच्या परवानग्यांचा पुनर्विचार करण्याची मागणी करण्यात आली. खाणकामामुळे भूजलपातळी, विहिरी आणि शेतकऱ्यांच्या सिंचनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

नवीन डोलोमाइट खाणींना दिलेल्या परवानग्या स्थगित करून सुरू असलेल्या RCCPL व इतर खाणींच्या कामाबाबतही योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडविण्याऐवजी त्यांच्यावरच निर्बंध लादले जात असतील, तर हे धोरण शेतकरीहिताचे कसे, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला. प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राहुल दांडेकर यांनी दिला.निवेदनावर नीलेश येल्टीवार, प्रशांत, राजू उपरे, दिवाकर पुसाम, आसिफ कुरेशी, सौरव बीजगुनवार, अंकित खडसे, मनोहर पंधरे, युवराज नैताम यांच्या सह्या आहेत.

 

 

I

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page