Ajay Kandewar,Wani:- राजकीय रंगमंचावर आता वणी शहरात शिंदे सेनेचा डबल ‘V’ म्हणजे “विजय आणि विश्वास” चा जोरदार धमाका होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. येऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ने “स्वबळ” हेच आपले घोषवाक्य ठरवत, एकहाती सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे.
युतीचा दरवाजा बंद झाला तर आम्ही आपले ऑफिसच उमेदवारांसाठी खुले ठेवले आहे,” असा टोला शिंदे सेनेच्या स्थानिक नेतृत्वाने लगावला आहे. मित्रपक्षांनी आपला मार्ग वेगळा धरल्याने, आता शिंदे गटानेही शहरात सर्व १४ प्रभागांत झेंडा फडकवण्याची तयारी केली आहे.
नगराध्यक्षपदासह सर्व २९ जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला आहे. वणीकर जनतेच्या अपार “विश्वासावर” आम्ही उतरतो आहोत आणि प्रत्येक प्रभागात भगवा फडकवणारच,असा आत्मविश्वास स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.हा निर्णय मित्रपक्षांसाठी स्पष्ट संदेश देणारा ठरू शकतो.तिकीट हवं असेल तर या ‘त्या’ ऑफिसमध्ये नाहीतर मैदानात तयार राहा. अस आव्हान केलं आहे. पण शिंदे सेना ला किती उत्सुकता नागरिक दाखवतात हे आता पाहणं महत्वाचं आहे.

