Sunday, May 3, 2026
Homeवणीविविध मागण्यासाठी शिवसेनेची तहसीलवर धडक

विविध मागण्यासाठी शिवसेनेची तहसीलवर धडक

• तहसीलदारास निवेदन, आंदोलनाचा ईशारा

नागेश रायपुरे, उपसंपादक मारेगाव:- शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध मागण्या घेवुन शिवसेनेने येथील तहसील कार्यालयावर धडक दिली.यावेळी तहसीलदार दीपक पुंडे यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.पंधरा दिवसात मागण्या मान्य न केल्यास रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा यावेळी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

यात अतिवृष्टीग्रस्त लाभापासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना तत्काळ अनुदान वाटप करण्यात यावे.तसेच शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सर्व अतिवृष्टी ग्रस्थाना अनुदान देण्यात यावे. तसेच सर्व पिकांचे, शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे वाघा पासून व इतर वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यात यावे तसेच रोही व रान डुकरांना मारण्याची शेतकऱ्यांना परवानगी देण्यात यावी.सर्व शेतकऱ्यांना दिवसा व मोफत वीज देण्यात यावे.तसेच तालुक्यातील रस्त्याची झालेली दैनिय दुरवस्था दुर करुन नवीन रोडची निर्मिती करण्यात यावे.आदी मागण्या घेवुन सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी सेनेचे तालुका प्रमुख तथा माजी उपसभापती संजय आवारी,नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, ता.संघटक सुनील गेडाम, युवा सेनेचे तालुका प्रमुख मयुर ठाकरे, शहर प्रमुख अभय चौधरी, किसन मत्ते,श्रीकांत सांबजवार,गजानन ठाकरे, सोमेश्वर गेडेकर,जीवन काळे, प्रशांत सपाट, पंकज बलकी, संजय सोमलकर, आदी शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page