Tuesday, October 14, 2025
HomeBreakingवणीत शिवसैनिकांचा थरार — आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा दहा...

वणीत शिवसैनिकांचा थरार — आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा दहा मिनिटे ठप्प…..

.•काळे झेंडे दाखवत निषेध,

Ajay kandewar ,Wani:- वणी शहरात आज अभूतपूर्व घटना घडली — आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या ताफ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी दहा मिनिटे अडवून काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली.पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करणाऱ्या मंत्र्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. हजारो हेक्टर शेती पावसामुळे बाधित असताना, “शेतकऱ्यांची भेट घेण्याचीही तसदी न घेणाऱ्या” मंत्र्यांवर संतप्त शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर उतरून “ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना पन्नास हजार एकरी मदत द्या!” अशी घोषणाबाजी करत ताफा थांबवला.

या घटनेने वणी पोलिस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. काही शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी, मंत्र्यांच्या ताफ्याला तब्बल दहा मिनिटं ठप्प केल्याचा इतिहास शिवसैनिकांनी आज रचला आहे.वणी शहरात मंत्र्यांच्या ताफ्याला थांबवणारे हे पहिलेच आंदोलन ठरले आहे.उईके यांच्या शांत दौऱ्याला “जनतेच्या आक्रोशाचा आवाज” भिडला — आणि त्यातच शिवसैनिकांनी दाखवले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आता रस्त्यावर उतरून उत्तर द्यावेच लागेल “शेतकरी हवालदिल, मंत्री निवांत — हे चालणार नाही

“ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना दिलासा द्या अशा स्वरूपाची मागणी करीत वणीत शिवसैनिकांनी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा दहा मिनिटं अडवून भर रस्त्यात राडा केला. वणी पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतले पुढील कारवाई सुरू आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments