Wan:- वणी नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि मनसेच्या उघड पाठींब्यालाही भाजपाने ठामपणे आव्हान देत संपूर्ण नगरपरिषदेवर वर्चस्व प्रस्थापित केले. थेट नगराध्यक्ष पदापासून नगरसेवकांच्या संख्याबळापर्यंत भाजपचा एकतर्फी दबदबा स्पष्टपणे दिसून आला.
विशेष म्हणजे, मनसेची साथ असूनही आ. संजय देरकरांचा चांगल्या निकालाची राजकीय अपयशाचा सामना करावा लागला, यामुळे वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचे अस्तित्व फक्त घोषणांपुरतेच मर्यादित असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. निवडणूक रणांगणात ‘मनसे फॅक्टर’ हवा तयार करण्यातही अपयशी ठरल्याचे निकालांनी दाखवून दिले.
स्वत:ला बदलाची ताकद म्हणवणाऱ्या मनसेचा मतांत रुपांतर न होणारा पाठींबा हा वणीकरांनी पूर्णपणे फेटाळला असून, जमिनीवर संघटनात्मक ताकद नसताना दिला जाणारा राजकीय पाठींबा केवळ कागदी वर्चस्वापुरताच मर्यादित राहतो, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.भाजपाने दाखवलेल्या ताकदीसमोर महाविकास आघाडीचा, आणि विशेषतः मनसेचा दावा पोकळ ठरला, तर वणी विधानसभा क्षेत्रात मनसेचा वचक शून्य असल्याचा राजकीय संदेश पुन्हा एकदा जनतेने ठामपणे दिला आहे.

