Ajay kandewar, Wani: सध्या राजकीय पक्षातील दुसऱ्या फळीतील पदाधिकारी, कार्यकत्यांचे इधर चला में उधर चला .. मैं आता पक्ष में मगर तेरे पक्ष की तिकीट देकर वोट दिला,अशी अवस्था सुरू झाली आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकांचे गणित पाहुन विविध पक्षांकडे प्रवेशाचे सोहळे रंगले आहे. राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कोलांटउडचालाही आता स्थानिक जनता गमतीचा भाग म्हणून बघत असल्याने निष्ठा व नीतिमतेची पूर्णतः पायमल्ली होत असल्याचे विदारक दृश्य आहे.
राजकारण हल्ली समाजसेवेचा विषय म्हणून उरलेच नाही. ज्या पक्षाकडून विविध प्रकारची कंत्राटे, अनेक व्यवसायात हवे असलेले राजकीय पाठबळ मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. स्थानिक भागात विरोधात राहून कुठलाही लाभ होत नसल्याने ही “बेडूक मंडळी” आपल्या सोयीनुसार सत्तेच्या वळचणीला जातात. नेमका त्याचा प्रत्यय जिल्ह्यात येतो आहे. विशेष म्हणजे जी बेडूक मंडळी तोंडसुख घ्यायची तीही उघडपणे मतदारसंघात जहा दम वहा हम अस फायद्याचा पक्षात जात असल्याचे चित्र आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे. प्रामुख्याने सत्ताधारी भाजप व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच आहेच पण त्यातही त्यातही “दोन्ही शिवसेना , काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षाचेही ” नेटवर्क तगडे व्हावे म्हणून जोरदार पक्ष बांधणी चालविली आहे. सर्वत्र बेरजेचे राजकारण केले जात आहे. त्याचा प्रत्यय त्यांच्या वणी मतदारसंघातही सर्वत्र येतो आहे.

