Ajay Kandewar Wani :- तप्त उन्हात वणवण भटकंती करणाऱ्या एका अनोळखी इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा कारण प्राथमिक तपासात सांगण्यात आलें. हा मृतदेह 25 ते 30 वयोगटातील त्या अनोळखीचा मृतदेह शुशगंगा प्रवेशद्वाराजवळील एका शेतातील झाडाखाली (ता.19 ) सायंकाळीं आढळून आला.
भूक व उन्हाच्या तडाख्याने त्या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेच्या माहितीवरून वणी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह उचलून ग्रामीण रुग्णालयाच्या शवगृहात पाठविला. अनोळखी इसमाच्या अंगावर राखळ टी शर्ट ; निळा जिन्स पॅन्ट घातलेला होता. हातात कळा घातलेला होता.मृताची उंची ५ फूट ६ इंच असून, गोर सावळा आहे. अद्याप मृताची ओळख पटली नसून, पोलीस नातेवाइकांचा शोध घेत आहेत. या अनोळख्या मृतदेहाची ओळख पटल्यास मारोती पाटील मो नं .९७६३३०४७८१ संपर्क करावा, असे आवाहन केले आहे. या घटनेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

