Ajay Kandewar,Wani:- वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीचा शंखनाद आता प्रत्यक्ष झाला आहे.राज्य निवडणूक आयोगाने अखेर नगरपरिषदेची प्रभाग रचना व जातनिहाय आरक्षण (रोस्टर) जाहीर केल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण संपूर्णपणे खवळले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक संभाव्य उमेदवारांनी आपापल्या “बालेकिल्ल्यांची” मांडणी केली होती.पण नव्या रोस्टरने अनेकांची समीकरणं गोलमाल केली आहेत.काही प्रभागांमध्ये ‘बाशिंग बांधलेले’ कार्यकर्ते उत्साहात उड्या मारत असतानाच, काहींच्या चेहऱ्यावर “आता काय?” असा प्रश्न उमटला आहे.या नव्या रचनेनुसार १४ प्रभागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण गटांसाठी पुरुष आणि महिला अशा दुहेरी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी काही प्रभागांमध्ये पहिल्यांदाच S.T आणि S.C महिलांसाठी आरक्षण लागू झाल्याने, नवीन नेतृत्वाला राजकारणात उतरण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.काही जुन्या दिग्गजांच्या पायाखालची वाळू सरकली.ज्यांनी वर्षभर तयारी केली, त्यांना आरक्षणाने डावलले आणि ज्यांनी गप्प बसून पाहत राहिले, त्यांच्यासाठी अचानक दरवाजे उघडले.ही रचना म्हणजे शतरंजाचा नवा पट आहे. कोणाचं हत्ती कुठं चालेल, आणि कोणता प्यादा मात देईल, हे पुढच्या काही दिवसांतच कळेल.रोस्टर जाहीर होताच शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही गट) आणि मनसे यांचे स्थानिक नेते आतापासूनच आपापल्या “सेटिंगची” मांडणी करू लागले आहेत.प्रत्येक पक्षात “कोणत्या प्रभागात कोण?” यावरून अंतर्गत तणाव वाढला आहे.विशेष म्हणजे, काही प्रभावशाली गटांनी “आपला प्रभाग गेला” म्हणून नाराजीही व्यक्त केली आहे.वणी शहरात मागील काही काळापासून सुरू असलेली गटबाजी आता या रोस्टरमुळे आणखी तीव्र होणार आहे.नव्या आरक्षणामुळे महिला उमेदवारांना मोठी संधी मिळाली असून,महिला राजकारणाचा नवा अध्याय उघडण्याची दाट शक्यता आहे.
•कोणत्या प्रभागात कोण उतरणार …
प्रभाग क्रमांक 1 :- पुरुष- ना.मा.प्र, महिला- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक 2 :- पुरुष- ना.मा.प्र, महिला- सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्रमांक 3 :-पुरुष- सर्वसाधारण, महिला – ना.मा.प्र (महिला)
प्रभाग क्रमांक 4 :-पुरुष-सर्वसाधारण,महिला – S.C (महिला)
प्रभाग क्रमांक 5 :-पुरुष-S.C,महिला – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 6 :-पुरुष-सर्वसाधारण,महिला -S.C
प्रभाग क्रमांक 7 :-पुरुष-ना.मा.प्र,महिला-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 8 :-पुरुष- सर्वसाधारण ,महिला -ना.मा.प्र
प्रभाग क्रमांक 9 :-पुरुष-सर्वसाधारण,महिला-ना.मा.प्र
प्रभाग क्रमांक. 10 :- पुरुष- सर्वसाधारण, महिला-सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 11 :-पुरुष-सर्वसाधारण,महिला- S.T महिला.
प्रभाग क्रमांक 12 :-पुरुष- S.T ,महिला-सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक 13 :-पुरुष-सर्वसाधारण ,महिला – ना.मा.प्र
प्रभाग क्रमांक 14 :- पुरुष -ना.मा.प्र,महिला -सर्वसाधारण