Saturday, May 2, 2026
HomeBreakingवणी कुणबी समाजाचा मान उंचावणारा क्षण....

वणी कुणबी समाजाचा मान उंचावणारा क्षण….

Ajay Kandewar,Wani:- वणी शहराच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच नाव ठळकपणे चर्चेत आहे ते म्हणजे भाजपचे नगरसेवक लक्ष्मण उरकुडे. प्रभाग क्रमांक तीनचे प्रतिनिधित्व करत असलेले उरकुडे आज केवळ नगरसेवक न राहता कुणबी समाजाच्या आशा-अपेक्षांचे प्रतीक बनले आहेत. नगरपरिषद उपाध्यक्ष पदासाठी त्यांच्या नावाची खमंग आणि ठोस चर्चा शहरात रंगू लागल्याने राजकीय वातावरण तापले आहे.हसमुख स्वभाव, मदतकारी वृत्ती आणि समाजाशी घट्ट नातं हीच उरकुडे यांची खरी ओळख. सामाजिक क्षेत्र असो वा वैद्यकीय क्षेत्र, अधिकारी स्तरापर्यंत असलेला त्यांचा दांडगा संपर्क आणि विश्वासार्ह प्रतिमा यामुळे ते सर्वसामान्यांपासून प्रशासकीय वर्तुळापर्यंत सर्वांच्या परिचयाचे नाव ठरले आहेत.

याच विश्वासावर आज कुणबी समाजाचा एक सक्षम, सकारात्मक आणि अभ्यासू चेहरा नगरपरिषदेत पुढे येताना दिसत आहे.विशेष बाब म्हणजे, वणी नगरपरिषदेत आजवर कुणबी समाजाला उपाध्यक्ष पदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे लक्ष्मण उरकुडे यांच्या रूपाने ही ऐतिहासिक संधी मिळेल का, याकडे केवळ कुणबी समाजाचेच नव्हे तर सर्व समाजाचे लक्ष लागले आहे. हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नसून, प्रतिनिधित्व, सन्मान आणि सामाजिक समतोलाचा मुद्दा म्हणून पाहिला जात आहे.

भाजपच्या शिस्तबद्ध नेतृत्वशैलीला शोभणारे, मेडिकल क्षेत्रात विशेष एक मोठ नाव,कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणारे आणि सर्वसमावेशक विचार मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून उरकुडे यांचे नाव पुढे येणे हे भाजपच्या सामाजिक समरसतेच्या भूमिकेचेच प्रतिबिंब मानले जात आहे.जर उपाध्यक्ष पदाची संधी कुणबी समाजाला मिळाली, तर ती केवळ पदाची निवड नसून समाजाच्या विश्वासावर उमटलेली शिक्कामोर्तब ठरेल.आज वणी शहरात एक प्रश्न सर्वांच्या ओठांवर आहे.“नगरपरिषद उपाध्यक्ष पदावरून कुणबी समाजाला न्याय मिळणार का?”आणि त्या उत्तराच्या केंद्रस्थानी आहे एकच नाव — लक्ष्मण उरकुडे. आता वणीतील भाजपा ही “अगदी जवळचा व्यक्ती” निवडून उपाध्यक्ष देतात की समाजाचा आरसा पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page