Monday, October 19, 2026
HomeRajurराजूर कॉलनीत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर.....

राजूर कॉलनीत अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर…..

Ajay,Wani:- समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार जनमानसात रुजविणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना उजाळा देत राजूर कॉलनीत सामाजिक एकतेचा प्रेरणादायी सोहळा 18 ऑक्टो.रविवार रोजी उत्साहात पार पडला. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचे अनावरण, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक’ या नामफलकाचे अनावरण आणि वृक्षारोपण असे तीन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. महापुरुषांचे विचार केवळ स्मरणापुरते मर्यादित न ठेवता ते कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य तथा गावातील ज्येष्ठ नेते अशोक वानखेडे , जिल्हा काँग्रेस सरचिटणीस तथा राजूर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डेविड पेरकावार, माजी जिल्हा परिषद सदस्य संघदीप भगत, ज्येष्ठ नेते मारोती पाटील, शिक्षक प्रकाश तालावार, चिखलगाव-राजूरचे युवा समाजसेवक फैजल खान आणि लढा संघटनेचे संस्थापक प्रवीण खानझोडे यांची प्रमुख उपस्थितीत झाले.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून कॉम्रेड ॲड. कुमार मोहरपुरी, माजी सरपंच धनराज देवतळे, मो. अस्लम, जाफर खान, रियाजुल शेख, समया कोंकटवार, रवी कोमलवार, सुरज चाटे, वणीचे युवा नगरसेवक ऋतिक मामीडवार, ॲड. सिडाम, पास्टर रोशन,साजिद खान, जयंत कोयरे, राजू बोरगलवार, ऐतसामभाई, वकील कुरेशी, भाजप युवा नेते अनिल डवरे,आणि पत्रकार विनोद आदे उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानासह त्यांच्या समतावादी, परिवर्तनवादी आणि शोषितांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विषमता दूर करून बंधुता, सामाजिक सलोखा आणि मानवतेची मूल्ये दृढ करण्यासाठी अण्णाभाऊंचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. उपस्थित समाजबांधवांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक प्रकाश तालावार यांनी केले, सूत्रसंचालन महेश लिपटे यांनी केले, तर आयोजक अजय कंडेवार यांनी आभार प्रदर्शन केले. तैलचित्र आणि चौक नामफलकाच्या अनावरणातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, तर वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page