Monday, May 25, 2026
HomeUncategorizedमतदारांचे फेव्हरेट उमेदवार "राजेश्वर उर्फ राजू चापडे " ठरणार.....! 

मतदारांचे फेव्हरेट उमेदवार “राजेश्वर उर्फ राजू चापडे ” ठरणार…..! 

•प्रभाग 13 ‘ब’ मध्ये मतदारांचा कौल "राजू भाऊकडे."

Ajay Kandewar,Wani : नगरपरिषद निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक 13 ‘ब’ मध्ये राजेश्वर उर्फ राजू चापडे यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, शेवटच्या दिवशी मतदारांचा कौल स्पष्टपणे त्यांच्याकडे झुकलेला दिसत आहे.प्रभागातील वातावरण पाहता “या वेळी अव्वल तर राजू चापडेच” अशी भावना मतदारांमध्ये ठळकपणे उमटत आहे.

गेल्या काही दिवसांपासून घराघरांत सुरू असलेल्या जनसंपर्क मोहिमेत चापडे यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षणीय ठरत आहे. साधेपणा, जमिनीशी निगडीत स्वभाव, लोकांशी सहज संवाद आणि वर्षानुवर्षे केलेली कार्यशील उपस्थिती यामुळे राजू चापडे यांच्याबद्दल मतदारांमध्ये विशेष विश्वासाचं नातं तयार झालं आहे.

प्रभागातील तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत, महिलांपासून व्यावसायिकांपर्यंत – सर्वच घटकांकडून चापडे यांना मिळणारी पसंती दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की,“राजू चापडे यांच्यासारखा साधा, सर्वांना सहज उपलब्ध आणि कामाचा माणूस प्रभागाला हवा. त्यामुळे यावेळी त्यांना अव्वल स्थानी आणण्याचा निर्धार मतदारांनी केला आहे.”निवडणुकीच्या शेवटच्या क्षणीही त्यांच्या नावाची प्रभागभर जोरदार चर्चा असून, 13 ‘ब’ मध्ये चापडे अव्वल राहतील अशी ठाम अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.राजू चापडे यांच्या वाढलेल्या जनाधारामुळे प्रभागातील निवडणूकसमीकरणे पूर्णतः त्यांच्या बाजूला गेली असल्याचे चित्र आज स्पष्टपणे उमटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page