Monday, December 22, 2025
HomeBreaking Newsब्रेकिंग : वणीत भाजपचा ‘सुपर स्ट्राईक’......

ब्रेकिंग : वणीत भाजपचा ‘सुपर स्ट्राईक’……

Ajay Kandewar, Wani :-वणी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करत शहराच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. थेट नगराध्यक्ष पदापासून ते नगरसेवक संख्याबळापर्यंत सर्वच आघाड्यांवर भाजपचा दबदबा स्पष्टपणे दिसून आला असून, ही निवडणूक भाजपसाठी एकतर्फी शक्तिप्रदर्शन ठरली आहे.

नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत भाजपच्या विद्या खेमराज आत्राम यांनी महाविकास आघाडीच्या डॉ. संचिता विजय नगराळे यांचा तब्बल ४,७९२ मतांनी दणदणीत पराभव केला. पहिल्याच फेरीपासून भाजपची आघाडी इतकी भक्कम होती की, एकाही टप्प्यावर विरोधकांना आव्हान निर्माण करता आले नाही. ही लढत निकालापूर्वीच एकतर्फी झाल्याचे मतमोजणीने सिद्ध केले.नगरसेवक निवडणुकीतही भाजपचा झेंडा बुलंद२९ सदस्यीय नगरपालिकेत भाजपने १८ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत पटकावले आहे. याउलट महाविकास आघाडीला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले.▪️ शिवसेना (उबाठा) – ६▪️ काँग्रेस – ३ तर २ जागा अपक्षांकडे गेल्या आहेत. संख्याबळाच्या लढतीत भाजपने विरोधकांना पूर्णतः मागे टाकले आहे.

•उपाध्यक्ष पदावरही भाजपचीच मोहर….

स्पष्ट बहुमतामुळे नगरपालिका उपाध्यक्ष पदही भाजपकडेच जाणे निश्चित झाले असून, वणी नगरपालिकेतील सत्ताकेंद्र पूर्णपणे भाजपच्या हाती आले आहे. त्यामुळे येत्या काळात नगरपालिकेचे प्रशासन, निर्णयप्रक्रिया आणि विकासाचा अजेंडा भाजपच ठरवणार हे स्पष्ट झाले आहे.या निकालाने वणीतील राजकीय समीकरणे बदलून टाकली असून, भाजपने पुन्हा एकदा आपली संघटनशक्ती, मतदारांवरील पकड आणि नेतृत्वाची ताकद सिद्ध केली आहे. वणी नगरपालिकेवर आता भाजपचा निर्विवाद दबदबा असून, शहराच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र आहे.

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments