Ajay Kandewar,Wani:- जळका फाटा येथे गुरुवारी रात्री झालेल्या भीषण बस-ट्रक दुर्घटनेनंतर काही क्षणांतच हाहाकार माजला होता. अर्धी बस अक्षरशः चिरडलेली, जखमींच्या वेदनांनी थरारलेला परिसर… परंतु या गोंधळात सर्वप्रथम धैर्य, संवेदना आणि निर्णयक्षमता घेऊन धावून आले ते आमदार संजय देरकर.
अपघाताची माहिती मिळताच कार्यक्रम अर्धवट सोडून घटनास्थळी पोहोचणारे र कदाचित पहिलेच लोकप्रतिनिधी. घटनास्थळी आमदार देरकर यांनी जीव वाचवण्यासाठी वेळेशी शर्यत सुरु केली.घटनास्थळी उभा राहिला ‘कमांड कंट्रोल’… आणि आमदारांच्या आदेशात सुरु झाले बचावकार्य!जखमींची परिस्थिती पाहून तातडीने स्वतः नंबर डायल करून पोलिस अधिकाऱ्यांना सूचनालगेचच अतिरिक्त अॅम्बुलन्सची मागणी केली. काही मिनिटांतच रुग्णवाहिका घटनास्थळी,प्रवाशांना बसच्या अवशेषातून बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांसह स्वतः समन्वय आणि गंभीर जखमींना प्राधान्य देत “गोल्डन अवर” मध्ये रुग्णालयात हलवण्याची काटेकोर अंमलबजावणी केली.अपघातातील अनेक जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिल्या की, आमदार संजय देरकर यांच्या काही मिनिटांच्या तत्परतेमुळे आज अनेकांना नवे जीवन मिळाले आहे.घटनास्थळी आमदारांनी दाखवलेली शांतता, संकटातही घेतलेले अचूक निर्णय आणि मनुष्यजीवनाला प्राधान्य देणारा दृष्टिकोन यामुळे संपूर्ण परिसरात केवळ एकच चर्चा की,“देरकर म्हणजे संकटात उभं राहणारा नेता…!”सध्या बहुतांश जखमींचे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्यावर आमदार देरकर स्वतः लक्ष ठेवत आहेत. प्रशासनालाही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत .
“एका जखमीचीही सेवा कमी पडू नये .भीषण अपघाताने हादरलेल्या जळका परिसरात एका लोकप्रतिनिधीने दाखवलेली मानवी संवेदना आणि जबाबदारी आज खरोखरच सकारात्मकतेचा किरण ठरली आहे.

