Ajay Kandewar, Wani :- वणी शहरातील निर्भीड आणि धडाकेबाज क्राइम रिपोर्टिंगसाठी ओळखले जाणारे पत्रकार रवी ढुमणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. त्यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सॲप संदेश आणि घरात सापडलेल्या डायरीतील कथित सुसाईड नोटमधून “त्या विक्की सेठ”चा थेट उल्लेख असल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून, शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रवी ढुमणे यांनी आत्महत्येपूर्वी “त्या विक्की सेठ” शी केलेला संवाद आणि डायरीतील लिखाण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याची चर्चा आहे. फसवणूक, मानसिक त्रास आणि सततचा दबाव यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी शब्दांत मांडल्याचे बोलले जात आहे. डायरीतील काही पानांवर सलग नोंदी आढळून आल्याने आत्महत्येमागील कारणे केवळ वैयक्तिक नसून त्यामागे ठोस व्यक्ती आणि परिस्थिती असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
निर्भीड पत्रकार म्हणून ओळख असलेला व्यक्ती असा निर्णय का घेईल, हा प्रश्न वणीत सर्वत्र विचारला जात आहे. घरी मिळालेल्या व्हॉट्सॲप मेसेज आणि सुसाईड डायरीतील मजकुरामुळे रवी ढुमणे यांच्या मृत्यूभोवती असलेले गूढ अधिक गडद झाले आहे. “त्या विक्की सेठ”चा उल्लेख हा योगायोग की आत्महत्येमागील मूळ दुवा—यावरून शहरात तीव्र चर्चा रंगली आहे.ही घटना केवळ आत्महत्येपुरती मर्यादित न राहता, फसवणूक आणि मानसिक छळाच्या आरोपांमुळे गंभीर स्वरूप धारण करत आहे. व्हॉट्सॲप संदेश आणि डायरीतील सुसाईड नोटने उघड केलेल्या धक्कादायक बाबींमुळे वणी हादरली असून, रवी ढुमणे यांच्या मृत्यूमागील सत्य नेमके काय—हा प्रश्न आता सर्वांच्या ओठांवर आहे. परंतु रवी धुमने यांची लेखी आपबिती बाबत मुलगा नयन रवी ढुमणे यांनी यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक यांना “त्या विक्की सेठ” बाबत लेखी तक्रार कार्यालयात जाऊन केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.
“विदर्भ न्यूज” ला रवी ढुमणे यांनी लिहिलेली सुसाईड नोट आणि त्याबाबत व्हाट्सअप संदेश व तक्रार परिवारा मार्फत प्राप्त झालेली आहे त्यावरून ही बातमी आणखी समोर विदर्भ न्यूज पाठलाग करून घेणार आहे.

