Friday, October 23, 2026
HomeBreaking Newsबेलोरा घाट :‘नाईट गेम जोऱ्यात’! तहसीलदारांची कारवाई ZERO.

बेलोरा घाट :‘नाईट गेम जोऱ्यात’! तहसीलदारांची कारवाई ZERO.

Ajay Kandewar,Wani:- तालुक्यातील बेलोरा घाट व बेलोरा घाटात सध्या रात्रीच्या वेळेत ‘मस्त खेळ’ चालण्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नियम, कायदे आणि महसूल यंत्रणा कागदावरच राहिल्याचं चित्र असून, तहसीलदारांची कारवाई पूर्णपणे शून्य असल्याचं वास्तव आता उघडपणे समोर येत आहे.

विशेष म्हणजे, घाटावर सुरू असलेल्या या कथित गैरप्रकारात सचिनची मज्जाच मजा सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. ‘दाम दुप्पट’ करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात असून, रात्रीच्या अंधारात घाटावर हालचाली वाढल्या तरी प्रशासनाला मात्र काहीच दिसत नाही का? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.या सगळ्या प्रकाराला महसूल प्रशासनचा खुला सपोर्ट असल्याचं स्पष्ट दिसत असल्याची चर्चा महसूल वर्तुळात रंगली आहे. त्यामुळेच कारवाई होत नाही का, की मुद्दाम दुर्लक्ष केलं जात आहे, असा संशय आता सामान्य नागरिकही व्यक्त करत आहेत.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कारवाईचा आलेख जिथे शून्य आहे, तिथे गैरप्रकारांचा आलेख मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. घाटावर हालचाली, आर्थिक खेळी आणि ‘सेटिंग’ची चर्चा असूनही महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत आहे.आता प्रश्न एकच महसूल प्रशासन झोपेतून उठणार का?की बेलोरा घाट ‘सपोर्टच्या छत्राखाली’ असाच सुरू राहणार?तोपर्यंत मात्र बेलोरा फाट्यावर खेळ रंगात, सचिन बेफिकीर आणि प्रशासन मूकदर्शक अशीच परिस्थिती कायम असल्याचं बोललं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page