Saturday, February 28, 2026
HomeBreaking"त्या" कारणाने अजिंक्य शेंडे यांचा राजीनामा......

“त्या” कारणाने अजिंक्य शेंडे यांचा राजीनामा……

Ajay Kandewar,Wani : रस्त्यावर उतरून लढणारा, प्रत्येक आंदोलनात पुढे असणारा शिवसेनेसाठी जीव ओतणारा अजिंक्य सुभाष शेंडे यांनी थेट जाहीर पत्र काढत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला रामराम ठोकला. युवासेना उपजिल्हा प्रमुख (यवतमाळ) पदाचा हा राजीनामा म्हणजे केवळ पदत्याग नसून, संघटनेतील अस्वस्थतेचा उघड स्फोट मानला जात आहे. वणी विधानसभासह संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने राजकीय वर्तुळ हादरले असून, “आज एक भारदस्त युवा गडी गेला, उद्या आणखी मोठा हादरा उबाठाला बसणार?” असा थेट सवाल उपस्थित झाला आहे.

ऑक्सिजन सिलिंडरपासून स्वच्छता मोहिमांपर्यंत, विद्यार्थ्यांच्या मदतीपासून आंदोलनांपर्यंत ज्याने प्रत्यक्ष मैदानात काम केले, तोच युवक आज बाजूला पडतो—हे चित्र स्थानिक उबाठा गटासाठी मोठा धक्का असल्याची मानले जात आहे. अजिंक्य शेंडे यांच्या पत्रातील शब्द धारदार आहेत: काम करणाऱ्यांची दखल नाही, निर्णय काही मोजक्यांच्याच हातात, आणि निष्ठेचा मोबदला दुर्लक्ष! हा टोला कुणासाठी आहे, हे वेगळं सांगायची गरज उरत नाही. “रस्त्यावरचा शिवसैनिक नको, फक्त होकार देणारे चालतात” अशीच परिस्थिती असल्याचा अप्रत्यक्ष पण घणाघाती आरोप या राजीनाम्यातून पुढे आला आहे.

हा राजीनामा कोणावर वैयक्तिक आरोप करणारा नसला, तरी वणी येथील स्थानिक व्यवस्थेवरचा थेट वार आहे. युवकांमध्ये संतोष आणि चर्चेची लाट उसळली असून, उबाठा गटाच्या संघटनात्मक पकडीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. निष्ठा अपमानित झाली तर आवाज उठणारच—असा संदेश अजिंक्य शेंडे यांच्या निर्णयातून स्पष्ट जातो. आज हा आवाज बाहेर पडला आहे; उद्या आणखी किती “मीच पक्ष म्हणणाऱ्या ना हा जणू मोठा हादरा आहे.आणखी किती बाहेर पडतील, याची धास्ती आता उबाठा गटाला लागली असावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page