देव येवले,झरी : जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेटच्या वतीने ३ आक्टोंबरला अडेगाव येथील जिजाऊ ज्ञान मंदिर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये गावातील शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनी हंशिका विठ्ठल ठेंगणे व त्रिशाला नंदू ठेंगणे यांचा सत्कार करण्यात आला.



या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष संदीप आसुटकार सर, प्रमुख पाहुणे पुंडलिक पारखी, शिक्षिका प्रणाली आसुटकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या गांधीजीच्या जीवन संघर्षाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रणाली आसुटकार यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सिंधुबाई टेकाम यांनी मेहनत घेतली.



