Ajay Kandewar,Wani:- पिंपळगाव परिसरातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त व ग्रामस्थांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे. वेकोलीच्या बेजबाबदार कारभाराविरोधात गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी जुनाड फाटा येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन उभारण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धूळ, प्रदूषण, नादुरुस्त रस्ते, आरोग्यदोष आणि डम्पिंगचा धोका या समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त आहेत. तरीही वेकोलीचे वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.अनेक निवेदनं, बैठका आणि पत्रव्यवहार करूनही तोडगा नाही. आता आम्हीच वेकोलीला जागं करणार असा इशारा सरपंच दीपक मत्ते यांनी दिला.ग्रामस्थांनी स्पष्ट केलं की, ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता होणाऱ्या आंदोलनादरम्यान काहीही अप्रिय घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वेकोली प्रशासनाचीच असेल
.