Monday, May 25, 2026
HomeUncategorizedक्राइम बीटचा निर्भीड आवाज हरपला....

क्राइम बीटचा निर्भीड आवाज हरपला….

•पत्रकार रवी ढुमणे यांचे निधन.

Ajay Kandewar,Wani :- शहरातील क्राइम रिपोर्टिंगसाठी ओळखले जाणारे पत्रकार रवी ढुमणे यांचे निधन झाल्याची धक्कादायक घटना (ता.१५)सोमवारी सकाळी समोर आली. त्यांच्या आकस्मिक जाण्याने केवळ वणी शहरच नव्हे, तर संपूर्ण पत्रकार बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.

रवी ढुमणे हे पत्रकारितेतील निर्भीड आणि स्पष्टवक्ते व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. विशेषतः गुन्हेगारी विषयांचे वार्तांकन, कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्न, अवैध धंदे, भ्रष्ट यंत्रणा आणि सर्वसामान्यांवर होणारे अन्याय हे त्यांच्या पत्रकारितेचे केंद्रबिंदू होते. अनेक वेळा दबाव, धोके आणि अडथळे येऊनही त्यांनी सत्य मांडण्याचा मार्ग कधीच सोडला नाही.क्राइम रिपोर्टिंग हा त्यांचा मुख्य ‘बीट’ होता. पोलिस तपासातील त्रुटी, दुर्लक्षित प्रकरणे, गरीब व पीडितांचा आवाज बनत त्यांनी अनेक प्रकरणांना वाचा फोडली. त्यांच्या बातम्यांमुळे अनेक वेळा प्रशासनाला हालचाल करावी लागली होती.

अलीकडच्या काळात ते मानसिक तणावातून जात असल्याची चर्चा होती. सोमवारी सकाळी ही दुर्दैवी बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. त्यांच्या पार्थिवावर वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ते ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.सत्यासाठी झगडणारा एक निर्भीड आवाज आज शांत झाला असून, रवी ढुमणे यांच्या जाण्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

(विदर्भ न्यूज परिवारातर्फे रवी ढुमणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.)

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page