Friday, October 23, 2026
HomeBreaking Newsकायरमध्ये देशी दारू दुकानाचा कारभार बिनदिक्कत ....

कायरमध्ये देशी दारू दुकानाचा कारभार बिनदिक्कत ….

• ग्रामपंचायतीला डावलून सरळ व्यापार. • सरपंचाने घेतला पुढाकार .

Ajay kandewar,Wani : तालुक्यातील कायर येथील मालमत्ता क्र. ९५४/५ मधील देशी दारूचे दुकान थेट कायर–मुकुटबन रोडवरील ८०४ क्रमांकाच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या स्थलांतरासाठी ग्रामपंचायत कायरचे नाहरकत प्रमाणपत्र न घेताच दारू दुकान सुरु करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीच्या अधिकारांचा बेजबाबदारपणे अवमान करून असा दारूचा धंदा सुरु करणे ही गावकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब ठरत आहे. गावात सामाजिक समस्या, तरुण पिढीचे होणारे नुकसान आणि कायदा-सुव्यवस्थेवर होणारा परिणाम याकडे दुर्लक्ष करून दुकान चालवणारा मालक स्वतःला कायद्यापेक्षा वर समजतो का, असा सवाल निर्माण झाला आहे.

या प्रकाराविरोधात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदन देऊन सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता संबंधित प्रशासन झोपेतून जागे होऊन त्वरित कारवाई करते का, की पुन्हा एकदा दुर्लक्ष करीत दारू माफियांना संरक्षण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.यावेळी निवेदन देताना सरपंच नागेश धनकसार, उपसरपंच माया मोहुर्ले , सदस्य नंदकिशोर अंबोरे,बाळकृष्ण पेंदोर व महेश गुरणुले आणि सलीम कुरेशी हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page