Monday, September 21, 2026
HomeUncategorizedकाँग्रेसला वणीत मोठ्ठं भगदाड,"बंटी ठाकूर" ची शिवसेनेत रीएन्ट्री....!

काँग्रेसला वणीत मोठ्ठं भगदाड,”बंटी ठाकूर” ची शिवसेनेत रीएन्ट्री….!

•उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अनेकांनी धनुष्यबान हाती घेतला.

Ajay Kandewar,Wani:- शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे सध्या मिशन टायगर सुरू आहे. त्यात अन्य पक्षातील काहीजणांचे पक्षप्रवेश करून घेण्याचा प्रयत्न आहे. वणी शहरात काँग्रेसचे खंबीर नेतृत्व असलेले तसेच सोबत युवकांची मोठीं फळी असलेले बंटी ठाकुर यांचा शिवसेनेत प्रवेश होणार अशी चर्चा सुरू होतीच 3 एप्रिल रोजी यवतमाळ येथील पोस्टल मैदानावर झालेल्या आभार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत काँग्रेसचे बंटी ठाकुर यांनी धनुषबाण हाती घेत शिवसेनेत ग्रँड एंट्री केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार सभेला उसळलेला जनसमुदाय…. तो क्षण…….

लोकसभा विधानसभा निवडणूका झाल्या आता नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. वणी शहरात शिंदे गटाने अनेक पक्षाला आधीच खिंडार पडले आहे.बहुतांश एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत करताना दिसत आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरू आहे. अनेक मातब्बर व जिगरबाज कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड ,यवतमाळ जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष उपस्थितीत बंटी ठाकुर यांनी काँग्रेसचा सोड चिठ्ठी देत शिवसेना (एकनाथ शिंदे) गटात जंगी प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यात अनेकांनी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा नेतृत्वाला पसंती दिली आहे. तसेच विनोद मोहितकर यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या व कार्यकर्त्यांमूळे शिवसेनेला उभारी मिळाली असून येत्या नगरपरिषद, जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत “भगवा फडकविणार” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे युती सरकार स्थापन केल्यापासून शिवसेनेत प्रवेशासाठी ओघ सुरू असून,हे काही नवीन मिशन नाही,’ असेही ते म्हणाले.

यवतमाळ जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर यांच्या मार्गदर्शनात मी शिवसेनेत प्रवेश केला.मुळात याच पक्षात मी आधी कामं केलें. आता पुन्हा मला या पक्षात संधी मिळाली आहे. स्व .हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्व.आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने पक्षाला वाढविण्यासाठी सतत प्रयत्न मी करणार आहोत आणि वणी शहरं येत्या काळात भगवेमय करणार ही हमी सुद्धा मी देत आहो- बंटी ठाकुर (शिवसैनिक, वणी)

 

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page