सुरेंद्र इखारे, वणी – येथील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले आता सर्वप्रथम नगर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहे . तेव्हा महत्वपूर्ण नगर पालिकांच्या निवडणुका लागतात तेव्हा कार्यकर्त्यांची अधिक जबाबदारी असते. त्या दृष्टीकोनातून कशा प्रकारचे निर्णय ते घेऊन कामाला लागतील त्यावर अवलंबून आहे . निवडणुकीच्या काळात नकारात्मक बोलणं बंद केलं पाहिजे .अशा काळात बोलणं म्हणजे विरोधकांना प्रोत्साहन देणे आहे आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता काम करतो आहे असा याचा अर्थ होतो . काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन पक्षासाठी काम करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील वणी,मारेगाव व झरी तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे वतीने आगामी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका संदर्भात वणी येथील शेतकरी मंदिरात आज दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 1.00 वाजता पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित केला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड प्रफुल मानकर हे होते. प्रमुख पाहुणे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, जिल्हा महिला अध्यक्षा वंदना आवारी, तालुका महिला अध्यक्षा संध्याताई बोबडे, शहर अध्यक्षा सविता ठेपाले, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर,शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, सेवादल अध्यक्ष प्रमोद लोणारे, जिल्हा सेवादल अध्यक्ष राजू कासावार, सौ मॅकलवार, अरुनाताई खंडाळकर, आशाताई टोंगे, जिल्हा उपाध्यक्ष इजहार शेख, महेंद्र लोढा, ऍड देविदास काळे, उत्तम गेडाम, राजाभाऊ पाथरडकर, डॉ मोरेश्वर पावडे, डॉ भाऊराव कावडे, पुरुषोत्तम आवारी, सुनील वरारकर, प्रशांत गोहोकार, बँकेचे संचालक राजू एलटीवार, आशिष खुलसंगे, उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाची माजी नगरसेविका मंदा पुसनाके याना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक झरी तालुका अध्यक्ष आशिष खुलसंगे यांनी केले. मार्गदर्शन करताना ठाकरे पुढे म्हणाले जर कार्यकर्त्यांनी एकजूट होऊन मनामध्ये गाठ बांधली की ,या निवडणुका जिंकायच्याच आहे तर कोणीही त्यापासून वंचीत करू शकत नाही त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचार व्यवस्थित केला तर कोणतीही निवडणूक हरण्याचा विषय येत नाही ही जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे असे मत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री वसंतराव पुरके, ऍड प्रफुल मानकर, माजी आमदार वामनराव कासावार , ऍड देविदास काळे, महेंद्र लोढा, जफार अली खान, अरुनताई खंडाळकर, वंदना आवारी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर यांनी केले तर आभार प्रमोद निकुरे यांनी मानले या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याला वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वणी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी ,सदस्य व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला व कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व जय घोषाणी झाली .

