Ajay Kandewar,Wani:- गिट्टी खदान मध्ये उत्खनन करण्यासाठी जात असलेला पोकलॅड मशीनने काम करतांना स्टेरींग वरून सुटून १०० फूट खोल खाणीत पडली त्यात चालक गंभीर जखमी झाला होता . चंद्रपूर येथील इस्पितळात उपचारादरम्यान १६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली
मोहदा येथे मोठ्या प्रमाणात गिट्टीसाठी लागणारा दगडाच्या खाणी असून दररोज हजारो ब्रास दगडाचे उत्खनन केल्या जात आहे.या परिसरात १२ ते १५ गिट्टी क्रेशर असून कार्यान्वित आहे. या क्रेशरसाठी लागणारा दगड उत्खननासाठी हजारो हेक्टर जमिनीवर उत्खनन करणाऱ्यांसाठी शासकीय लिजवर जमिनी वाटप करून खदाणी निर्माण केल्या आहे.
मोहदा येथील क्रेशर मालक इस्माईल जैनुद्दिन झवेरी यांच्या नावे असलेल्या गिट्टी खदानीत काल रात्री १० वाजता च्या सुमारास राणू अहिरवार वय २६ वर्षाचा चालक हा प्रोकलॅन मशीन घेऊन उत्खननासाठी जात असता त्याचे प्रोकलॅन चालवित असताना संतुलन सुटले १०० फूट खोल खदाणीत पोकलॅड मशीनने कोसळले असता यात चालक राणू अहिरवार रा. मोहदा हा चालक गंभीर जखमी झाला होता त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
“मोहदा गावातील गट क्र. २८३ मध्ये असून त्या खदाण ची लिज ही संपली असल्याची चर्चा आहे. गावातील काही नागरिकांनी ती खदाण गावाजवळ आहे म्हणून बंद केली होती. गावातील नागरिकांनी प्रशासन अधिकाऱ्याकडे त्या खदाण ची एटीएस मोजणीची मागणी पण केली होती त्यावर काही कार्यवाही केली गेली नसल्याने गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत उचित चौकशीची मागणी होत आहे.”

