•टेकडी गार्डन मधील हृदय हेलावणारी घटना.
प्रकाश खिल्लारे,पुसद :- पुसद येथील छत्रपती शिवाजी वार्डात राहणाऱ्या युवकाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि.४ जानेवारी २०२४ रोजीच्या पहाटे उघडकीस आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण मात्र करू शकले नाही. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.Mother is suffering from cancer, father is disabled and he hanged himself.

अनंता भोईराज गुडदे वय ३५ वर्षे रा.छत्रपती शिवाजी वार्ड , पुसद असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.त्याचा व त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी शहरांमध्ये फिरून चहा विकत होता.त्याच्या पश्चात त्यांची पत्नी,चार बहिणी आहेत.तर आई कॅन्सर ग्रस्त व वडील अपंग आहेत.एकुलत्या एक कर्ता पुरुषाने आत्महत्या केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.घटनेच्या काही तासांपूर्वी तो घरी कोणालाही सांगता निघून गेला होता.त्याने बरखा टॉकीज जवळील टेकडी गार्डन मधील एका लिंबाच्या झाडाला लुंगीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.वृत्त लिहोस्तोवर शहर पोलिसांकडून कारवाई सुरू होती.लटकलेल्या अवस्थेत मृतदेह पाहण्यासाठी रहिवाशांनी तोबा गर्दी केली होती.कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

