•राष्ट्रीय विद्यालयातही मुलींनीच गड राखला.
•हिंदी माध्यम मधुन कु.रहनुमाबानो रीयाजुल हसन 75% घेऊन प्रथम.
अजय कंडेवार,वणी :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अमरावती विभागामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल काल दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला .वणी तालुक्यातील राष्ट्रीय विद्यालय राजुर काॅलरी येथील शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 मध्ये झालेल्या दहावीच्या बोर्ड परीक्षेत विद्यालयाचा निकाल 98.88% टक्के लागला आहे. विद्यालयातून एकूण 90 विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 17 विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत,43 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 27 विद्यार्थ्यी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयातून कु.अनम फातमा मो. सिद्दीकी. 90% गुण घेऊन प्रथम, कु. युतिका समय्या कोंकटवार 87% द्वितीय, तर कु. पोर्णीमा संतोष उल्लेराव 85% तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.Anam Siddiqui first and Yutika Konkatwar second..Girls also held the fort in national schools..

तसेच हिंदी माध्यमातून कु.रहनुमाबानो रीयाजुल हसन 75% घेऊन प्रथम आली. याच प्रमाणे प्रावीण्य श्रेणीतील.कु.सुजाता विनायक वेषांतर 84%,रावबाण शंकर टेकाम 82%, हिमांशू मारोती कवाडे 82%,कु. साक्षी संतोष आत्राम 82%,कार्तिक दशरथ धानोरकर 82%,कु. वेदीका मंगेश जुनघरे.81.%
कु. सृष्टी मोजेस कोमलवार 80%,कु. आरती दीपक पवार. 80%,कु. पायल किशोर कोहळे.79%,कु. समीक्षा प्रमोद ठमके 77%,कु.गुणगुण शंकर पेंटापत्तीवार. 75%
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्षा विमल बापुराव पानघाटे, मुख्याध्यापक डी.टी. धानोरकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व समस्त पालकांनी कौतुक केले.

