Ajay kandewar,Wani:- वाढत्या घरफोडींना अखेर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने जबरदस्त दणका दिला आहे. वणी परिसरात सलग घरफोड्या करणाऱ्या अट्टल चोरट्यांना एलसीबीने जेरबंद करत आठ घरफोडींचा थरारक पर्दाफाश केला आहे.
२४ डिसेंबर रोजी पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद हालचाली आढळताच एलसीबी पथकाने १)सचिन सतोष नगराळे रा. बोरगाव अहेरी ता वणी जि. यवतमाळ ह.मु. न्यु सोमठाणा ता भद्रावती जि चंद्रपुर २) कार्तीक शंकर साळवे रा. घुटकाळा,वार्ड नेहरु शाळा मागे,चंद्रपुर यांना ताब्यात घेतले. कौशल्यपूर्ण व कसून चौकशीत त्यांनी केलेल्या चोरींची कबुली दिली आणि त्यावरून वणी व भद्रावती परिसरातील एकूण आठ घरफोडी उघडकीस आल्या. आरोपींकडून चांदीचे दागिने, इलेक्ट्रॉनिक साहित्य व रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या चोरट्यांना पकडून एलसीबीने गुन्हेगारांना स्पष्ट इशारा दिला असून नागरिकांमध्ये पुन्हा एकदा सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईने घरफोडी करणाऱ्यांचे मनसुबे उधळून लावले आहेत.यात मुख्य आरोपी सचिन सतोष नगराळे रा. बोरगाव अहेरी ता वणी जि. यवतमाळ, ह.मु. न्यु सुमठाणा ता.भद्रावती जि.चंद्रपुर अट्टल घरफोड्या असुन त्याचेवर जिल्हा चंद्रपुर,भद्रावती,राजुरा, घुग्गुस, गडचांदुर तसेच जिल्हा वर्धा,यवतमाळ येथे चोरीच्या गुन्हयाची नोंद आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात LCB PI सतिश चवरे,API दत्ता पेंडकर,PSI धनराज हाके, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, सलमान शेख, रजनिकांत मडावी,सतिश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

