Saturday, February 28, 2026
HomeBreaking Newsअजिंक्य शेंडे यांच्या विचारसरणीला सलाम......

अजिंक्य शेंडे यांच्या विचारसरणीला सलाम……

Ajay Kandewar,Wani:- वणीतील शिवसैनिकांचा उत्साह, निष्ठा आणि महापुरुषांप्रती असलेली श्रद्धा रायगड वारीच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसून आली. पवित्र रायगड किल्ला कडे भगवा झेंडा हाती घेत शिवसैनिक रवाना झाले. जयंती निमित्त परिसर स्वच्छ ठेवत महापुरुषांच्या चरणी अभिवादन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ही वारी केवळ धार्मिक किंवा पारंपरिक नसून स्वच्छता, संस्कार आणि स्वाभिमानाची जपणूक करणारी चळवळ ठरत आहे.

या उपक्रमामागे प्रेरणादायी नेतृत्व म्हणून अजिंक्य शेंडे आणि राजू तुराणकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. त्यांच्या विचारसरणीतून आणि दूरदृष्टीतून ही स्वच्छता अभियान वारी साकारली. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कृतीतून संदेश देण्याचा त्यांचा दृष्टिकोन युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह आणि संघटनात्मक बळ निर्माण झाले आहे.

छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गाडगे बाबा यांच्या विचारांना कृतीतून अभिवादन करत शिवसैनिकांनी समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. अजिंक्य शेंडे व राजू तुराणकर यांच्या विचारसरणीला सलाम करत वणीकर जनतेने या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. ही वारी म्हणजे महापुरुषांच्या वारशाचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत तो अभिमानाने पोहोचवण्याचा निर्धारच आहे. या वारीला अजिंक्य शेंडे , राजू तुरणकर, बंडु चांदेकर, नंदू ढूमने , दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे,मनिष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले,मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीय,श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया,सुयेश नगराळे ,संजोग झाडे, तुषार दुरुटकर हे सर्व निघाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

Most Popular

Recent Comments

You cannot copy content of this page